Tuberculosis
Tuberculosissakal

Tuberculosis : जगभरातील २ टक्के लोकांना प्रभावित करतोय आतड्यांसंबंधी दुर्मीळ क्षयरोग

क्षयरोग (टीबी) फक्त फुप्फुसातच होत नाही, तर आतड्यांमध्येही होतो.
Published on

पुणे - क्षयरोग (टीबी) फक्त फुप्फुसातच होत नाही, तर आतड्यांमध्येही होतो. अशाच आतड्यांसंबंधित दुर्मीळ क्षयरोगग्रस्त ३७ वर्षीय रुग्णावर पुण्यात यशस्वी उपचार करण्यात आले.

मुंबई येथील या रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. औषधोपचार करूनही ताप उतरला नाही. त्यांना स्थानिक डॉक्टरांनी हिवताप, टायफॉइड आणि डेंगीची चाचणी घेण्याचा सल्ला दिला. मात्र या वैद्यकीय चाचण्यांमधून काहीच निदान झाले नाही.

रुग्णाची स्वयंरोग प्रतिकारक चाचणी आणि पोटाची सोनोग्राफी करण्यात आली. त्याचेही ‘रिपोर्ट नॉर्मल’ आले. त्यानंतर कोलोनोस्कोपी आणि एंडोस्कोपी करण्यात आली. त्यात मोठ्या आणि लहान आतड्याचा अल्सर दिसून आला. सामान्यतः लहान आणि मोठ्या दोन्ही आतड्यांमधील अल्सर हे ‘क्रॉन्स डिसीज’ नावाच्या आजारामध्ये दिसून येतात. त्याला आतड्याचा दाहक रोग म्हणून ओळखले जाते. रुग्णाची एक ‘बायोप्सी‘ घेण्यात आली. मात्र यात ‘क्रॉन्स डिसीज’ची लक्षणे दिसली नाहीत. नंतर रुग्णाची क्षयरोगाची चाचणी करण्यात आली. त्यातून रुग्णाला क्षयरोग झाल्याचे निदान झाले.

Tuberculosis
Pune News : शहरात पूर नियंत्रणासाठी अडीचशे कोटीचा आराखडा

डॉ. शहा सांगतात,

- मोठ्या आतड्याच्या कोणत्याही भागात क्षयरोग होऊ शकतो. परंतु, लहान आतड्यांत अल्सर होत नाही.

- अशा रुग्णाच्या बाबतीत, ७५ टक्के अल्सर हा लहान आतड्यांत असल्याचे आढळून आले तसेच आतड्यांना सूज दिसून आली.

- वेळेत निदान आणि उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

- अल्सरेटिव्ह आतड्यांसंबंधी क्षयरोग सामान्यतः फुप्फुसीय क्षयरोगापेक्षा दुय्यम असतो.

- ओटीपोटात दुखणे, अतिसार, भूक न लागणे, ताप, अशक्तपणा, वजन कमी होणे आणि पोटात पेटके येणे अशी काही लक्षणे आढळून येतात.

- वरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

- आतड्यांसंबंधी क्षयरोगाचेही तीन प्रकार

- पहिला - अल्सरेटिव्ह क्षयरोगात, आतड्यांना व्रण दिसून येतात. ही समस्या ६० टक्के रुग्णांमध्ये आढळते.

- दुसरा - हायपरट्रॉफिक क्षयरोगात, आतडे जाड आणि कडक होतात. ही समस्या १० टक्के रुग्णांमध्ये आढळून येते.

- तिसरा - अल्सरेटिव्ह हायपरट्रॉफीत आतड्यांमध्ये अल्सर आणि ब्लॅाकेज विकसित होतात. असे जवळपास ३० टक्के रुग्ण आढळून येतात.

आतड्यांमध्ये अल्सर

अपोलो स्पेक्ट्राचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सम्राट शहा म्हणाले, ‘औषधोपचार करूनही रुग्णाचा ताप कमी झाला नाही. कोलोनोस्कोपी आणि बायोप्सिमध्ये रुग्णाच्या आतड्यांमध्ये अल्सर असल्याचे आढळून आले. याला आकड्यांसंबंधी क्षयरोग म्हणतात. अशा परिस्थितीत त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार रुग्णावर औषधोपचार सुरू करण्यात आले. आता रुग्ण बरा झाला आहे आणि ताप उतरला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.