---

---

Published on

पुण्यनगरी न्हाऊन निघाली भक्तिरसात

सर्वांमाजी श्रेष्ठ पुण्यभूमी वैकुंठ ।
विठ्ठल मूळपीठ जगदोद्धार ॥
निवृत्ती निरोपण ज्ञानदेवा ध्यान ।
सर्वत्र नारायण एकरूप ॥
पालखी सोहळा मुक्कामामुळे सोमवारी पुण्यनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका दर्शनासाठी अलोट गर्दी लोटली होती. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकरांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.


आरोग्य तपासणी, गोळ्या वाटप
पुणे: वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व गोळ्या वाटप करण्यात आले. डॉ. मोनिका काटे-पानसरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात १५०० जणांची तपासणी केली. हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय वाकडेवाडी येथे आयोजित केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.