राज्याला स्थिरता मिळणे
महत्त्वाचे : दीपक केसरकर

राज्याला स्थिरता मिळणे महत्त्वाचे : दीपक केसरकर

Published on

पुणे, ता. २९ : ‘‘राज्याचा विकास महत्त्वाचा असतो. मुख्यमंत्री कोण हे महत्त्वाचे नसते. मुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी केल्यावर त्याचा परिणाम जनतेच्या प्रतिसादातून दिसतो. विविध सर्वेक्षणांत त्याचे प्रतिबिंब उमटत आहे. फिरता चषक असू शकतो, पण राज्याला स्थैर्य मिळणे महत्त्वाचे असून त्यासाठी मुख्यमंत्री हे प्रमुख पद आहे,’’ असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘फिरते मुख्यमंत्रिपद’ यावरून चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता केसरकर यांनी हे उत्तर दिले. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या कार्यक्रमासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रिपद हे राज्याचे प्रमुख पद आहे. अर्थात याचा विचार वरिष्ठांनी करायचा आहे. त्यांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. माझ्या दृष्टीने राज्यातील स्थिरता आणि लोकांना आपण काय देऊ शकतो, हे जास्त महत्त्वाचे आहे.’’
जागावाटपाबाबत ते म्हणाले, ‘‘याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रमुख आहेत. त्यांनी हा निर्णय घ्यावयाचा आहे. या निवडणुकीत महायुती चांगली कामगिरी करेल. सरकारने अनेक चांगले आणि लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसेल.’’
राज्यातील आर्थिक स्थिती चांगली नसल्याच्या टीकेबाबत केसरकर म्हणाले,‘‘महाराष्ट्र संपन्न राज्य आहे. राज्याची आर्थिक गरज लक्षात घेऊनच निर्णय घेतले जात आहेत.’’
बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या ‘एन्काउंटर’बाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चेबद्दल ते म्हणाले, ‘‘आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे अनेकजण होते. ‘एन्काउंटर’ मुद्दाम केले जात नाही. ‘एन्काउंटर’नंतरही चौकशी केली जाते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी पोलिसांवर हल्ला करतात. अशावेळी पोलिसांना प्रतिहल्ला करण्याशिवाय पर्याय नसतो.’’
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.