पुण्यात उद्या रंगणार ‘सोबतीचा करार’

पुण्यात उद्या रंगणार ‘सोबतीचा करार’

Published on

पुणे, ता. ३० ः कवी-गीतकार वैभव जोशी यांच्या कविता, गझल यांची पर्वणी असणाऱ्या ‘सोबतीचा करार’ ही मैफील बुधवारी (ता. २) सायंकाळी ५ वाजता कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे रंगणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित या अनोख्या काव्यपर्वणीविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
‘रावेतकर ग्रुप’ हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. आणि ‘द नेचर - मुकाईवाडी’ हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत. विशेष म्हणजे ‘सकाळ’तर्फे आयोजित हा प्रयोग या कार्यक्रमाचा १५० वा प्रयोग आहे. या विशेष प्रयोगाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सुखन’ हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करणारे ओम भुतकर यात सहभागी होणार आहेत. मैफिलीच्या पूर्वार्धात वैभव जोशी आणि ओम भुतकर हे काही स्वरचित रचना तसेच अन्य कवींच्या काही आवडलेल्या रचना सादर करणार आहोत.
आजवर ‘सोबतीचा करार’ या मैफिलीचे प्रयोग देशासह परदेशातही सादर झाले आहेत. वैभव जोशी यांच्या स्वरचित मराठी-हिंदी कविता, रुबाई, गझलांच्या सादरीकरणाची पर्वणी या कार्यक्रमातून मिळते. या कार्यक्रमाचे संगीत डॉ. आशिष मुजुमदार यांचे असून दत्तप्रसाद रानडे हे गायक आहेत. त्यांना संवादिनी, सिंथेसायझर आणि आणि सहगायनाची साथ निनाद सोलापूरकर करतात. तबल्यावर समीर शिवगार, ढोलक व पखावाजवर आमोद कुलकर्णी आणि गिटारवर मिलिंद शेवरे हे साथसंगत करतात.

तिकिटे येथे उपलब्ध
किस्से, कविता, गझल अशी समृद्ध काव्य पर्वणी असणाऱ्या या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झाली आहे. ही तिकिटे आरक्षित करण्यासाठी bookmyshow.com किंवा ticketkhidakee.com या संकेतस्थळाला भेट द्या, अथवा बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

वैभव जोशी यांचा ‘सोबतीचा करार’ हा कार्यक्रम रसिकांना दर्जेदार ‘काव्यसफर’ घडवणारा आहे. काव्यप्रेमींना आणि गानप्रेमींना निखळ आनंद देणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होता येत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक - लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांना आम्ही नेहमीच पाठबळ देत असतो. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘सोबतीचा करार’ हा असाच एक दर्जेदार कार्यक्रम आहे. रसिकांना ही काव्यमैफील नक्की आवडेल, याची खात्री वाटते.
- सुशीलकुमार देशमुख, चेअरमन, ‘द नेचर - मुकाईवाडी’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.