Pune Cab Drivers Strike : २० फेब्रुवारीपासून पुण्यात ठप्प होणार ओला-उबर! कॅबचालक का करत आहेत काम बंद आंदोलन?
Pune News : पुण्याच्या प्रादेशिक परिवहन समितीने ‘कॅब’साठी दर निश्चित केले आहे. मात्र, पुण्यात प्रवासी सेवा देणाऱ्या ओला, उबेर सारख्या कंपन्या त्या दराची अंमलबजावणी करीत नाही. परिणामी कॅब चालकांचे नुकसान होत आहे. (dr keshav kshirsagar says cab drivers on strike)
कॅब कंपन्यांनी दराची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या वतीने मंगळवारपासून (ता. २०) कॅब चालक संप करणार आहेत, असे इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले. १ जानेवारी २०२४ पासून नवीन दर लागू झाले. मात्र, ओला, उबेर यासारख्या कंपन्या प्रत्यक्षात त्या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाही.
परिणामी याचा फटका कॅब चालकांना बसत आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल.
या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी करत नाही. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संगम ब्रिज जवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येतील, अन् निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात सुमारे २० हजार कॅब चालक सहभागी होणार असल्याचा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.