Paduka Darshan : पादुकादर्शनात समाजस्वास्थ्याचा नवा पैलू
Pune News : वाढता ताणतणाव, धकाधकीचे आयुष्य आणि व्यसनाधिनतेमुळे दिवसेंदिवस समाजस्वास्थ्य बिघडत चालले आहे. ‘श्रीगुरू पादुकादर्शन सोहळ्या’मुळे आध्यात्मिक उन्नतीचा नवा मार्ग अधोरेखित होत आहे.
यातूनच हरवलेले समाजस्वास्थ्य बदलण्याचा नवा पैलू उलगडला जाईल, असा विश्वास शहरातील विविध देवस्थानाचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. २१) व्यक्त केला.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड’च्या माध्यमातून २६ व २७ मार्चला नवी मुंबईत ‘श्रीगुरू पादुकादर्शन सोहळा’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन व्हावे, हा यामागील उद्देश आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा उपक्रम होणार आहे.
अभय संचेती, अध्यक्ष, स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्ट ः देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त साधू-संतांचे वास्तव्य आहे. संस्कार, संस्कृती आणि आपलेपण या संतांनीच महाराष्ट्राच्या मातीत रुजवलेले आहे. संतांच्या विचारांमुळेच महाराष्ट्र सर्व बाबतीत अग्रेसर आहे. पादुकादर्शन सोहळ्यामुळे सर्वांना अध्यात्माची ओढ लागेल. यामुळे जीवनाला गती आणि चांगला मार्ग मिळेल. आध्यात्मिक कार्यक्रम हा काळाची गरज आहे.
राजेश शहा, अध्यक्ष, लेक टाऊन जैन मंदिर ः आपत्तीच्या काळात मदत करण्याबरोबरच ‘सकाळ’ने आता समाजाची आध्यात्मिक गरजही ओळखली आहे. धकाधकीच्या जीवनात आध्यात्मिकतेची आवश्यकता पूर्ण करणारा हा उपक्रम ‘सकाळ’ने निवडला आहे. त्याला शुभेच्छा. रायकुमार नहार, अध्यक्ष, दी पूना मर्चंट चेंबर ः समाजाची मानसिक गरज ओळखून ‘सकाळ’ने हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी दी पूना मर्चंट्स तर्फे शुभेच्छा.
राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, श्रुतदीप रिसर्च फाउंडेशन ः भक्ती, सेवा, ज्ञान आणि अर्थ या मार्गांची ओळख करणारा हा स्तुत्य उपक्रम आहे. समाजातील शांती आणि स्वास्थ्य राखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. युवकांनी निश्चित याचा सदुपयोग करून घ्यावा.
वनीता कुलकर्णी ः समाजस्वास्थ्यासाठी हा आजच्या काळाशी अनुरूप असा उपक्रम आहे. मनःस्वास्थ्य आणि आध्यात्मिक विकास हा विषय मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जायला हवा.
किरण शिंदे, सरचिटणीस, भाजप, पुणे शहर ः बऱ्याचदा मंदिरांमध्ये जाऊनही पादुकांचे दर्शन होत नाही. त्यात अनेक तासांचा प्रवासही करावा लागतो. पण एकाच ठिकाणी पादुकांच्या माध्यमातून सर्व देवांचे आणि संतांचे दर्शन होत आहे.
रघुराजशास्त्री पारेकर, वारजे ः १८ संतांचे एकाच ठिकाणी दर्शन करणे हे भाग्याचे लक्षण आहे. महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली असून १८ संतांच्या पादुकांचे दर्शन हे दुग्धशर्करा योग आहे.
अरुण अनंता दांगट, प्रमुख विश्वस्त, श्री पावसा गणपती देवस्थान ः धकाधकीच्या जीवनात युवा पिढीला संतांच्या अध्यात्माची ओळख होणे गरजेचे आहे. १८ संत पादुकांच्या दर्शनाने ही सुरवात होईल. समाजजीवनाला क्रीडा, आरोग्य आणि शिक्षणाबरोबरच अध्यात्माचेही अंग आहे. यानिमित्ताने त्याचे महत्त्व समोर येईल.
आझाद हिंद मित्र मंडळ ः समाजमन प्रसन्न करणारा हा उपक्रम आहे. याला शाळा महाविद्यालयापर्यंत पोचवायला हवे. यासाठी आम्ही नक्की सहभाग देऊ.
रूपाली महेंद्र मगर, तनिष्क सदस्य ः आजचा युवा वर्ग मानसिक स्थैर्य मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या व्यसनाधिनतेच्या गर्तेत असलेल्या युवकांसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.
डॉ. प्रिती काळे, अध्यक्ष, जिओ फाउंडेशन ः नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. कुटुंबाला एकत्र करणारा आणि संतदर्शनाचा योग ‘सकाळ’च्या या उपक्रमामुळे येणार आहे.
विशाल केकाणे, कामगार युनियन, मार्केटयार्ड ः युवकांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम गरजेचा आहे. भौतिक प्रगतीबरोबरच आध्यात्मिक प्रगती साधली जाईल.
महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे. पादुकादर्शन कार्यक्रमातून वारसा आणि वसा जोपासण्याचे काम सकाळ करत आहे. संपूर्ण कुटुंबालाच तीर्थ दर्शनाचा लाभ या कार्यक्रमातून होईल.
- विश्वास कळमकर, अध्यक्ष, सुरानंद फाउंडेशन
गोपाळ कुलकर्णी, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ वारजे माळवाडी ः अध्यात्म म्हणजे सर्व संग परित्याग नाही तर संसारात राहून परमार्थ साधणे. ‘सकाळ’च्या उपक्रमातून हेच ध्येय साध्य होत आहे.
चंद्रशेखर बिल्दीकर, सेवा निवृत्त ः व्यसनाधिनता, ताणतणाव आणि धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्य गरजेचे आहे. भारतीय आध्यात्मिक परंपरेत यात गुरूचे महत्त्व असून, पादुकादर्शन कार्यक्रमातून तो भाव साध्य होत आहे.
पी. एल. गोरे, शनी मारुती मंदिर, वारजे ः अध्यात्म आणि भौतिकतेची सांगड घालणारा हा उपक्रम नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल. एकाच ठिकाणी १८ संत पादुकांचे दर्शन मोठी पर्वणी आहे.
शिरीष मोहिते, सेवा मित्र मंडळ ः आपला समाज पूर्वी देव आणि धर्म या तत्त्वांचे पालन करणारा होता. मधल्या काळात अति पुढारलेपणामुळे संतांचे कार्य किंवा त्यांचे विचार आचरणात आणण्याचे प्रमाण कमी झाले होते. पण ‘सकाळ’मुळे संतांच्या कामाची माहिती नवीन पिढीला होणार असल्यामुळे ही नवीन पिढी परत एकदा संत विचारांशी जोडली जाईल.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, विश्वस्त, श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा नारद मंदिर ः आजच्या काळात समाजाची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी कुटुंब प्रबोधन हा महत्त्वाचा घटक आहे. सर्व कुटुंब समावेशक मार्गाने ‘सकाळ’ची चाललेली वाटचाल लाख मोलाची ठरेल.
सागर पवार, विश्वस्त, डुल्या मारुती देवस्थान ः महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा पाया संतांनी घातला. समानतेचा संदेश देत त्यांनी दिशा देण्याचे काम केले. ‘सकाळ’च्या उपक्रमामध्ये पुन्हा एकदा संत विचारांचा प्रभाव सर्वांचे कल्याण करेल. या उपक्रमास शुभेच्छा.
राजेंद्र बेंद्रे, हिंदू युवा प्रबोधिनी संघटना ः ‘सकाळ’चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोणत्याही कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान असणे गरजेचे आहे. श्रीगुरू पादुकांच्या दर्शनाने नवीन ऊर्जा घेऊन समाज योग्य मार्गावर कार्यरत राहण्यास मदत होणार आहे.
कोरे हेरिटेज ः हा उपक्रम अतिशय उत्तम असून अभिनंदनीय आहे. याच्या आयोजनाबद्दल ‘सकाळ’चे धन्यवाद.
संजय वाल्हेकर, प्रमुख विश्वस्त, श्री गुरूदेव सेवा ट्रस्ट, वारजे ः ‘सकाळ’ समूह’ने हा घेतलेला कार्यक्रम अनमोल आहे. गुरू-शिष्य परंपरा ही समाजातील तरुणांना सांगणे गरजेचे आहे. या पिढीला ध्यान धारणेची गरज आहे. ‘सकाळ’च्या कार्यक्रमामधून संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ अनेकांना घेता येणार आहे. त्याबद्दल आभार.
प्रकाशभाऊ शिंदे, सर्वात्मक महारूद्र परिवार ट्रस्ट ः गोंधळलेली समाज व्यवस्था फक्त अध्यात्माच्या मार्गाने जागेवर येऊ शकते. त्यामुळे असे उपक्रम समाजहिताच्या दृष्टीने योग्य प्रकारे जनतेसमोर आणल्याने ‘सकाळ’ला धन्यवाद.
किशोर पवार, व्यवस्थापक, पुणे प्रार्थना समाज ः ‘सकाळ’चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्याला आमच्या सगळ्या सभासदांकडून शुभेच्छा. असे उपक्रम वारंवार राबवावे आणि सर्वांना त्यामध्ये समाविष्ट करून घेतल्याचा आनंद वेगळाच आहे.
संतोष नांगरे, अध्यक्ष कामगार युनियन ः संतोष नांगरे, अध्यक्ष कामगार युनियन ः ‘सकाळ’च्या माध्यमातून अत्यंत चांगला उपक्रम होतो आहे. मनःशांतीसाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. स्वस्थ शरीरासाठी असे उपक्रम उपयुक्त आहेत.
अनिरुद्ध भोसले, अध्यक्ष, अडते असोशिएशन ः सर्वच जाती-धर्माच्या लोकांना एकाच छताखाली आणणारा हा उपक्रम आहे. पादुकांचे दर्शन करण्याचे भाग्य लाभणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. धकाधकीच्या जीवनात अशा उपक्रमाचा अनुभव मिळणे गरजेचे आहे.
अरुण वीर, अध्यक्ष, फुलबाजार अडते ः ‘सकाळ’ सर्वसामान्य घटकांचा विचार करून त्यांना चांगल्या उपक्रमात सामावून घेत आहे त्याचे कौतुक आहे. थोडक्यात संतांच्या पादुकांचा होणारा हा मेळा अनुभवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल आभार.
दीपक थोरात, कोषाध्यक्ष, श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट ः जेथे सर्व थांबते तेथे अध्यात्म सुरू होते. आजच्या काळात त्याची खूप आवश्यक आहे. त्याचा विचार ‘सकाळ’ने केला आहे. हा विचार तरुणांना दिशा देणारा आहे. या उपक्रमास शुभेच्छा.
रवींद्र फटाले, विश्वस्त, पासोड्या विठोबा मंदिर ः ‘सकाळ’ने हाती घेतलेला उपक्रम चांगला आहे. एकाच ठिकाणी विविध संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा दुग्धशर्करा योग आहे. पुढच्या पिढीला या उपक्रमातून संतांच्या कार्याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमास शुभेच्छा.
दिलीप थोरात, समाजसेवक ः प्रपंचातून परमार्थ साधणे ही सुखी जीवनाची किल्ली आहे. ही किल्ली पुन्हा एकदा शोधण्याचे काम ‘सकाळ’ने हाती घेतले आहे. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात भरकटलेल्यांना अध्यात्माची नवी ओळख करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम तरुणांसाठी हितकारक आहे.
मनोज सरपाटील, इतिहास संशोधक ः महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा वारसा आहे. तो जपण्याचे काम ‘सकाळ’च्या माध्यमातून होत आहे. या कार्यात आम्हाला समाविष्ट करत आहात ही उल्लेखनीय बाब आहे. असे कार्य करण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत.
सागर भोसले, अध्यक्ष, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळ ः सध्याच्या दगदगीच्या जीवनात मानसिक समाधानासाठी अध्यात्म खूप गरजेचे आहे. हीच गोष्ट सकाळने ओळखून सर्वांच्या जीवनात संतांची शिकवण पेरली जाणार आहे. हा उपक्रम युवकांसाठी कौतुकास्पद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.