Sakal Petopia: पाळीव प्राण्यांसाठी आरोग्य शिबिर
Sakal Petopia Pet Health Care Program
पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पाळीव प्राण्यांसाठी रविवारी (ता. २८) मगरपट्टा येथील अमनोरा पार्क टाऊन येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाळीव प्राणी, त्यांचे पालक आणि सर्व प्राणीप्रेमींसाठी तीन दिवसांचा ‘पेटोपिया गाला’ फेस्टिव्हल नोव्हेंबर २०२४ मध्ये होणार असून, प्राण्यांसाठी आरोग्य शिबिर या उपक्रमाचाच एक भाग आहे.
कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राण्यांमुळे त्यांच्या पालकांना व प्राणीप्रेमींना शारीरिक आणि भावनिक स्तरावर फायदा होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, पाळीव प्राण्यांसोबत खेळताना आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन तयार होते. हे हार्मोन मेंदू शांत होण्यास मदत करते. त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो. सतत प्राण्यांची देखभाल करणाऱ्यांमध्ये भावनांवर नियंत्रण राहण्याबरोबरच सामाजिक भान आणि स्वाभिमान अशा भावना वाढीस लागतात. प्राण्यांशी जबाबदारीने वागल्याने लहान मुलांवरही चांगले संस्कार होतात आणि ते अधिक जबाबदार बनतात.
आपल्या आरोग्याबरोबरच पाळीव प्राण्याचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आवश्यक असतात. त्यामुळे प्राण्यांना कोणताही आजार असल्यास त्याचे लवकर निदान करून उपचार करता येतात.
नावनोंदणी करून व्हा सहभागी
पाळीव प्राण्यांच्या आरोग्य तपासणीच्या जनजागृतीसाठी ‘सकाळ- पेटोपिया’ उपक्रमांतर्गत पाळीव प्राण्यांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे. यात प्राण्यांच्या तपासणीसह योग्य काळजी, पोषण, स्वच्छता, स्वच्छतेच्या पद्धती, प्राण्यांच्या जीवनपद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, आपल्या प्राण्यांची पुणे महापालिकेकडे नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. पाळीव प्राण्यांच्या आरोग्य तपासणीसाठी येथे क्लिक करून त्याद्वारे नावनोंदणी करून आरोग्य शिबिरात सहभागी होऊ शकता.
शिबिरातून मिळणाऱ्या प्रमुख बाबी ...
१) पुणे महापालिकेकडे पाळीव प्राण्यांच्या नोंदणीची सुविधा
२) आरोग्य तपासणी
३) प्राणी प्रशिक्षण मार्गदर्शन
४) पशुवैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन
५) सहभागींसाठी भेटवस्तू
शिबिराविषयी....
कधी : रविवारी (ता. २८ जुलै)
कुठे : अमनोरा पार्क टाऊन, मगरपट्टा, पुणे
केव्हा : सकाळी ८ ते ११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.