फसवणूक

फसवणूक

Published on

उत्तम परताव्याच्या आमिषाने
महिलेची १२ लाखांची फसवणूक
पुणे, ता. ११ : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर उत्तम परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी बिबवेवाडीतील एका महिलेची १२ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर चोरट्यांनी महिलेला संदेश पाठविला. तिचा विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांनी पैसे घेण्यास सुरुवात केली. महिलेने ऑनलाइन पद्धतीने ११ लाख ९८ हजार रुपये जमा केले. परतावा मागितल्यानंतर मात्र चोरट्यांनी मोबाईल क्रमांक बंद केल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दिली.
---
टास्कच्या आमिषाने तरुणाला
साडे पाच लाखांना गंडा
पुणे, ता. ११ : ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास मोठ्या रकमेचा पगार किंवा नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची पाच लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाईलवर संदेश पाठविला. समाज माध्यमांतील चित्रफीत, तसेच दर्शक पसंती मिळवून दिल्यास परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. घरातून ऑनलाइन काम करता येईल अशीही बतावणी करण्यात आली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार तपास करत आहेत.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com