अनेकजण मतदानापासून वंचित

अनेकजण मतदानापासून वंचित

Published on

बिबवेवाडी परिसराचा काही भाग बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघात जात असल्याने पुणे मतदारसंघातील अप्पर इंदिरानगर परिसरातील काही मतदारांची बारामती लोकसभा मतदारसंघात नोंद झाली आहे. त्याची माहिती नसल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले तर काहींची नावे गायब झाल्यामुळे मतदान करता आले नाही. काही मतदारांनी ओळखपत्र जवळ न ठेवता मोबाईल मधील फोटो गॅलरी मध्ये असलेले ओळखपत्र दाखवली. परंतु, त्यांना मूळ ओळखपत्र असल्याशिवाय मतदान करू दिले नाही, त्यामुळे पुन्हा ओळखपत्र आणण्यासाठी हेलपाटा मारवा लागला. महिलांसाठी स्वतंत्र रांगा असल्या पाहिजे, अशीही अपेक्षा काही महिलांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.