ev scooter consumer
ev scooter consumer

Pune : ईव्ही बदलून देण्याची ग्राहकाची मागणी आयोगाने फेटाळली, काय आहे कारण?

Published on

पुणे, ता. २६ : इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोष असल्याने ती बदलून देण्याच्या मागणीसाठी ग्राहकाने दाखल केलेली तक्रार ग्राहक आयोगाने फेटाळली. आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्या प्रणाली सावंत आणि शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.


तक्रारदार यांनी दावा दाखल केलेल्या वाहनाचा अपघात झाल्याने वाहनात वेळोवेळी तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. तसेच तक्रारदार यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ दुचाकीचा वापर केला आहे. जर वाहनात दोष असता तर ते वाहन चालवू शकले नसते, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे.

याबाबत सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या नागरिकाने ईव्ही टेक्नो इलेक्ट्रा मोटार्स प्रा. लि. आणि तिच्या संचालकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला काही महिन्यानंतर ग्राहकाने तक्रार केल्यानंतर कंपनीने ताबडतोब त्याबद्दल पूर्तता केली. त्यानंतर दुचाकीत काही समस्या निर्माण झाल्यानंतर कंपनीच्या निरीक्षकाने वाहनाची पाहणी केली व त्याबद्दल माहिती तक्रारदार आणि कंपनीस दिली. वाहनात सातत्याने दोष निर्माण होत असल्याने तक्रारदारांनी नवीन वाहन देण्याची मागणी केली. त्याला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारदारांनी कंपनीविरोधात आयोगात तक्रार दाखल करत गाडीची रक्कम १८ टक्के व्याजासह परत करावी. त्यासह तक्रार खर्च आणि मानसिक त्रासासह एकूण तीन लाख १० हजार रुपये देण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात कंपनी, डीलर आणि संचालकांच्यावतीने अ‍ॅड. अमित केंद्रे आणि अ‍ॅड. पुष्कर पाटील यांनी बाजू मांडली. तक्रारदार हे ग्राहकाच्या व्याख्येत बसत नसून त्यांनी आयोगापासून अनेक महत्त्वाचे मुद्दे दडवून ठेवले आहेत. तक्रारदार हे स्वतःच्या चुका लपविण्यासाठी कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप करत आहेत. तक्रारदारांनी वाहनाची सर्व्हिसिंगही कंपनीच्या अधिकृत केंद्रात केली नाही, असा युक्तिवाद ॲड. केंद्रे आणि ॲड. पाटील यांनी केला.

दोन वर्षे वाहन वापरले
दुचाकी दोन वर्षे वापरल्यानंतर तक्रार करण्यात आली आहे. वाहनधारकाच्या निष्काळजीपणामुळे वाहनात काही दोष निर्माण झाल्यास वॉरंटीची सुविधा उपलब्ध असणार नाही, असे वॉरंटी पुस्तकात नमूद असून देखील तक्रारदारांमार्फत अवास्तव मागण्या करण्यात आल्याचे ॲड. केंद्रे आणि अ‍ॅड. पाटील यांनी आयोगात नमूद केले. दोन्ही पक्षांची युक्तिवाद ऐकून न्यायालयाने ग्राहकाची तक्रार फेटाळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.