SSC HSC exam
SSC HSC examesakal

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सोळा जुलैपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होईल.
Published on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होईल. बारावीची परीक्षा १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३० जुलै दरम्यान होणार आहे. बारावीची ही प्रक्रिया १६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. बारावीच्या माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सात आणि आठ ऑगस्ट रोजी होईल.

पुरवणी परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून (ता. ३) उपलब्ध होईल. ही सुविधा फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

त्यावरून तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्‌सॲप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

पुरवणी परीक्षेचा कालावधी
तपशील : लेखी परीक्षेचा कालावधी

- बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) : १६ जुलै ते ८ ऑगस्ट
- बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) : १६ जुलै ते ३ ऑगस्ट
- दहावी : १६ ते ३० जुलै

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.