राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.
राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे. Sakal

विद्यार्थ्यांना वाणिज्य अन् व्यवस्थापनची ओढ!

राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.
Published on

Pune News : उत्कृष्ट व्यवस्थापक, सनदी लेखापाल (सीए), कंपनी सचिव (सीएस); एवढंच नव्हे तर उत्कृष्ट व्यावसायिक विपणन अधिकारी, विश्लेषक अशा उच्चभ्रू नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या वाणिज्य शाखेतून पदवी अभ्यासक्रम करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

म्हणूनच शहरातील नामंकित महाविद्यालयांमधील वाणिज्य शाखेतील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचा कटऑफ हा ८० टक्क्यांपेक्षा अधिक असणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विज्ञानातील अभ्यासक्रमांबरोबरच बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेतून पदवी अभ्यासक्रमाकडे ओढा असल्याचे दिसून येते.

राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे. या परीक्षेत वाणिज्य शाखेतून ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी एकीकडे बी.कॉम (ऑनर), बीबीए हे पदवी अभ्यासक्रम प्राधान्याने निवडतात आणि दुसरीकडे सीए, सीएस, सीएमए या परीक्षांच्या तयारीला लागतात.

म्हणूनच नामांकित महाविद्यालयांमध्ये या शाखेतून पदवी अभ्यासक्रम करण्याला हे विद्यार्थी पसंती देत असल्याने कट-ऑफ वाढत असल्याचे निरीक्षण प्राचार्यांनी नोंदविले आहे.
वाणिज्य शाखेतही चांगल्या पगाराच्या नोकरी उपलब्ध होत असल्याने असंख्य विद्यार्थी दहावीनंतरच या शाखेकडे वळतात. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी देखील अनेक विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रम निवडत असल्याचे दिसते.

राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.
Sakal Education Expo : पिंपरी-चिंचवडमध्ये आठ जूनपासून करिअर मार्गदर्शन

‘या’ अभ्यासक्रमांना पसंती
विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या व्यापारामुळे स्थानिक पातळीपासून ते जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत असल्याने वाणिज्य शाखा हा करिअरचा महामार्ग ठरत आहे. विविध राज्य-केंद्रीय विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे, खासगी विद्यापीठे यांमध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यावर वाणिज्य शाखेतून पदवी, पदव्युत्तर पदवी,

व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रमात पारंपारिक पदवीसह बीबीए-एमबीए अंतर्गत ह्यूमन रिसोर्स, मॅनेजमेंट सायन्स, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, बँकिंग ॲण्ड फायनान्स असे विषय घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. याशिवाय सनदी लेखापाल, कंपनी सचिव, कॉस्ट अकाउंटंट असे व्यावसायिक अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.
Study Room: मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढवायचीय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

वाणिज्य शाखा निवडीची कारणे

- स्थानिक ते जागतिक बाजारपेठेत नोकरी आणि व्यवसायाच्या वाढत्या संधी
- नोकरीसह उद्योजक होण्याचा राजमार्ग
- डेटा एन्ट्री ऑपरेटरपासून ते डेटा ॲनालिसिसपर्यंत नोकरी
- पूर्णवेळ अभ्यासक्रम करतानाही पार्ट टाइम नोकरी करणे शक्य
- लवकरात लवकर नोकरी मिळणे
- अभ्यासक्रम पूर्ण करताना अन्य संलग्न कोर्सेस करणे शक्य

राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.
Pune Metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे ६८ टक्के काम पूर्ण; वाहतूक कोंडीमधून होणार सुटका

‘‘गेल्या काही वर्षांपासून वाणिज्य शाखेतून पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. बारावीत चांगले गुण मिळविलेले विद्यार्थी सीए, सीएस, सीएमए अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतात. तसेच, बी.कॉम (ऑनर) सह बीबीएला विशेष महत्त्व देतात. परंतु बी.कॉम किंवा बीबीए करून एमबीए करण्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असतो. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले साधारणत: १० ते १५ टक्के विद्यार्थी पदवी शिक्षणासाठी वाणिज्य शाखेकडे वळत असल्याचेही दिसून येते.’’
- डॉ. यशोधन मिठारे, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा (अतिरिक्त कार्यभार), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.
SPPU Admission : दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

‘‘बारावीनंतर कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पारंपारिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तुलना करता वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक अशी ५० टक्के असते.
पदवीनंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरी, व्यवसाय आणि स्टार्टअपच्या संधींमुळे विद्यार्थ्यांची पसंती या अभ्यासक्रमाला आहे. म्हणूनच नामांकित महाविद्यालयांमधील वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा कटऑफ देखील वाढत असतो.’’
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर)

राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), सीआयएससीई परीक्षांचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.
Lavani Artist Employment: लावणी कलावंतांच्या रोजगारावर गदा! प्रमुख लोककला दुर्लक्षित; शासनाकडून पाठबळाची अपेक्षा

नोकरीच्या संधी
१. सीए, सीएस, सीएमए
२. व्यवसाय प्रशासक
३. व्यवस्थापक, विपणन
४. डेटा ॲनॅलिस्ट
५. गुंतवणूक, विमा, शेअर ट्रेडिंग नियोजक, सल्लागार
६. संख्याशास्त्रज्ञ

पदवीसह हे शिकता येईल
- परकीय भाषा शिकणे (उदा. जर्मन, फ्रेंच, जपानी आदी)
- संवाद कौशल्ये
- इंग्रजीवर प्रभुत्व मिळविणे
- शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक, विमा यांच्याशी संबंधित कोर्सेस

वाणिज्य शाखेतील ‘टॉप’ अभ्यासक्रम
- सीए, सीएस, सीएमए
- बी. कॉम (ऑनर्स)
- बी.बी.ए.
- चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट (सीएफए)
- बीबीए इन इंटरनॅशनल बिझनेस
- बी.बी.ए. कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
- बी.कॉम (इंटीग्रेटेड)
- बी. कॉम इन (कॉस्ट अकाउंटिंग/बॅंकिंग ॲण्ड फायनान्स/ मार्केटिंग मॅनेजमेंट/डिजिटल मार्केटिंग/रिटेल मॅनेजमेंट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.