पुण्याच्या रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट
पुणे, ता. ३ : नेहमी गर्दीने गजबजणारी दुकाने, हॉटेल्स आणि मॉल्समध्ये मंगळवारी मात्र कमालीची शांतता पाहायला मिळाली. सकाळपासूनच पुणेकरांचे लक्ष लोकसभेच्या निकालाकडे असल्याने कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे शहरातील महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांवर दुपारी चार वाजेपर्यंत शुकशुकाट पाहायला मिळाला.
निवडणुकांचे निकाल सामान्यतः दुपारपर्यंत स्पष्ट होतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. दुपार टळून गेली तरी विजयाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होत नव्हते. प्रत्येक फेरीनंतर बदलणारे आकडे पाहता सर्वांचीच उत्कंठा ताणली गेली होती. पुण्यासह संपूर्ण देशातच अशी स्थिती पाहायला मिळाली. बहुमताचा आकडा नक्की कोण गाठणार, या उत्कंठेने पुण्यातील रस्त्यांवरील वर्दळ दिवसभर विरळच होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.