बँक अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन
पुणे, ता. ६ : बँकेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन करून बँक अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार मागील तीन महिन्यापासून सुरू होता. याप्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४३ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. ५) फिर्याद दिली आहे. त्यावरून बँक अधिकारी नयनेश वाजकर मोनं (वय ५०) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंड गार्डन भागातील एका राष्ट्रीय बँकेत शिपाई म्हणून काम करतात. तर आरोपी नयनेश मोनं हा बँकेत वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे.
फिर्यादी महिला बँकेत काम करत असताना एक महिन्यापूर्वी आरोपीने महिलेसोबत असभ्य वर्तन करून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत कुठे तक्रार केली तर बघून घेईन अशी धमकी दिली. २८ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉइस कॉल केला. महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.