Ramdas Athavle
Ramdas Athavleesakla

Ramdas Athavle: "विधानसभेला तरी आमचा सन्मान ठेवा", महायुतीमध्ये रामदास आठवले आक्रमक, भाजपकडे केली 'इतक्या' जागांची मागणी

Republican Party of India Maharashtra Vidhansabha election 2024 bjp केंद्रात तिसऱ्यांदा मंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने (आठवले गट) रामदास आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी ही मागणी केली.
Published on

पुणे, ता. २५ : ‘‘लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजपने योग्य तो न्याय दिला नाही. तरीही आम्ही महायुतीसोबत निष्ठेने काम केले. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आम्हाला योग्य न्याय द्यावा. राज्यात आरपीआयला १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी आहे,’’ असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्रात तिसऱ्यांदा मंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने (आठवले गट) रामदास आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी ही मागणी केली.

ते म्हणाले, ‘‘राज्यात आमच्या पक्षाची चांगली ताकद आहे. विदर्भ-मराठवाडा असो की, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, सगळीकडे आमचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे या वेळी भाजप-शिवसेनेने आम्हाला सन्मानजनक जागा द्याव्यात. राज्यातील सरकार चांगले निर्णय घेत आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने महायुतीमध्ये लढू. आम्ही ज्यांच्याबरोबर असतो त्यांची सत्ता येतेच, हा आमचा इतिहास आहे.’’

लाडकी बहीण योजनेबाबत ते म्हणाले.‘‘ही योजना राज्यातील लाखो महिलांसाठी लाभदायक आहे. त्यामुळे त्याचा फायदा आगामी निवडणुकीत महायुतीला नक्कीच होईल.’’

मेळाव्यात होणाऱ्या मागण्यांबाबत आठवले म्हणाले,‘‘गेल्या काही वर्षांत आम्हाला महायुतीमध्ये योग्य ती वागणूक मिळाली नाही, हे पूर्णपणे खरे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत, यात काही शंका नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा भाजप-शिवसेनेने विचार केला पाहिजे. त्यामुळेच आम्ही राज्यात १२ जागांची मागणी करीत आहोत. ही मागणी आमची पूर्ण होईल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.

विरोधकांना अपयश

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकत्रितपणे येऊन अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. संविधानाबाबत जनतेत अनेक गैरसमज पसरविण्यात आले. परंतु एवढे सगळे करूनदेखील विरोधकांना त्यात यश आले नाही. असे सांगून आठवले म्हणाले,

‘‘ज्या काँग्रेसने एकेकाळी संविधानाची पायमल्ली केली होती, त्याच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशभर हातात संविधान घेऊन त्याला वाचविण्याची भाषा करीत होते. मात्र विरोधकांच्या या विखारी प्रचाराचा काहीही फायदा झाला नाही आणि तिसऱ्यांदा केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.