Pune, Shikhandi Dhol Pathak, Dhol Tasha, Pune Ganpati Festival
Pune Gapati Dhol PathakSakal

Pune Dhol Pathak: स्वागतार्ह! महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथीयांचे ढोल-ताशा पथक, नकारातून 'मनस्वी' प्रवास

Pune Ganpati Festival 2024: मनस्वी यांनी तृतीयपंथीयांचे स्वतंत्र पथक सुरू केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांचे वादन पाहायला मिळणार आहे.
Published on

Pune Ganpati Shikhandi Maharashtra First Transgender Dhol Pathak

प्रज्वल रामटेके
पुणे : ‘‘गणेशोत्सवात सर्वाधिक आकर्षण असते ते ढोल-ताशा पथकांचे. मलाही त्यात सहभागी होण्याची इच्छा होती. त्यामुळे मी काही पथकांकडे त्याबाबत विचारणा केली. मात्र समाजात जसा बहुतांश ठिकाणी तृतीयपंथीयांना नकार ऐकायला मिळतो, त्याचप्रमाणे इथेही नकार मिळाला. पण याच नकारातून एक प्रेरणा मिळाली आणि त्यातून निर्मिती झाली, ‘शिखंडी’ या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाची,’’ ही कहाणी सांगत होत्या मनस्वी गोईलकर या तृतीयपंथी.

Pune, Shikhandi Dhol Pathak, Dhol Tasha, Pune Ganpati Festival
Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पा मोरया..! बाप्पांची 'ही' ट्रेडिंग गाणी 'Instagram Reels' वर करतील लाइक्सचा वर्षाव

जसे मुला-मुलींचे, महिलांचे, कलाकारांचे स्वतंत्र ढोल-ताशा पथक आहे. त्याचप्रमाणे मनस्वी यांनी तृतीयपंथीयांचे स्वतंत्र पथक सुरू केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांचे वादन पाहायला मिळणार आहे. मात्र, तत्पूर्वी ढोल-ताशा कसे जमवायचे, सराव कोठे करायचा, प्रशिक्षण कोण देणार आदी अडचणी त्यांच्यासमोर होत्या. त्यावर मात करत ‘शिखंडी’ ढोल-ताशा पथकाचा चार ऑगस्टपासून मार्केट यार्ड परिसरात सराव सुरू झाला. या पथकाने नांदेड येथे झालेल्या राज्य सरकारच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये १६ ऑगस्टला त्यांचे पहिले वादन केले. तृतीयपंथी व्यक्तीही सक्षमपणे आपल्या बरोबरीने उभे राहू शकतात, हा संदेश ‘शिखंडी’ पथकाने समाजाला दिला. या पथकात शहराच्या वेगवेगळ्या भागांतील सध्या एकूण ३० तृतीयपंथी व्यक्ती आहेत. रोज सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत या पथकाचा सराव चालतो. (Pune Latest News)

‘शिखंडी’ हे पथक सुरू करताना अनेक अडचणी आल्या. मात्र इच्छाशक्ती आणि ठाम विश्वासाच्या जोरावर मार्ग काढत हे पथक सुरू केले. यंदा मानाच्या पाच गणपतींसह दगडूशेठ गणपती समोर आम्ही वादन करणार आहोत. यातून तृतीयपंथी व्यक्तीही सक्षमपणे आपल्या बरोबरीने उभे राहू शकतात, हा संदेश आम्हाला याद्वारे द्यायचा आहे.

कादंबरी शेख

Pune, Shikhandi Dhol Pathak, Dhol Tasha, Pune Ganpati Festival
Ganpati Festival 2024: सजावटीचा ट्रेंडही सोशल मीडियाकडून ‘हायजॅक’

याविषयी बोलताना मनस्वी म्हणाल्या, ‘‘माझ्या गुरू कादंबरी शेख यांनी तृतीयपंथी व्यक्तींचे एक स्वतंत्र पथक सुरू करायचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही कामाला सुरुवात केली. मात्र कोणालाही वादनाचा अनुभव नव्हता. मग काय करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. परंतु इच्छाशक्ती आणि ठाम विश्वासाच्या जोरावर मार्ग काढला. नादब्रह्म ढोल-ताशा पथकाचे अतुल बेहरे यांनी आम्हाला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली तर प्रीतेश कांबळे आणि प्रवीण सोनावणे यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली. कादंबरी यांनी माजी उपमहापौर दीपक मानकर यांना ही संकल्पना सांगितली. त्यांनी मदतीचा हात पुढे केला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...