--------

--------

Published on

पाणी वाहते, पैसा मुरतो!
पावसामुळे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर

पुणे, ता. १२ ः रस्त्यांवर पावसाळ्यात पुणेकरांना त्रास होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन ‘पाऊसपूर्व कामे’ या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करते. पण पहिल्याच पावसात शहराची दैना होते. गटारांची साफसफाई केली असा दावा केला जात असला तरी रस्त्यांच्या बाजूला खरंच गटारे आहेत का? असा प्रश्‍न पडावा अशी भयानक स्थिती आहे. रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा का होत नाही, याची कारणे शोधण्याचा प्रयत्नही कोणी करत नाहीत. शेवटी ‘यंदा सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस झाला’ असे पावसावरच खापर फोडून अधिकारी हात वर करतात. त्यामुळे कोट्यवधीचा निधी मुरतो कोठे? हा प्रश्‍न निरुत्तरितच राहतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.