Pune Crime News
Pune Crime NewsSakal

Pune Crime News : बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांचा खून

Pune Police Action : येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली.
Published on

Pune News : आंतरधर्मीय तरुणाने बहिणीस पळवून नेल्याच्या रागातून तिच्या भावाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता येरवडा येथील राजीव गांधी नगर परिसरा घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली.

कठाळू कचरूबा लहाडे (वय ६०, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी इस्माईल रियाज शेख (वय २४), संकेत उमेश गुप्ता (वय २१, दोघेही रा. राजीव गांधी नगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत लहाडे यांचा मुलगा धम्मकिरण लहाडे (वय २५) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील राजीव गांधीनगरमध्ये लहाडे व शेख कुटुंबीय राहतात. कठाळू यांचा मुलगा योगेश लहाडे (वय २४) याचे इस्माईलच्या बहीणीसमवेत प्रेमसंबंध होते.

Pune Crime News
Pune L3 Pub Case : ‘एल ३’ बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन; तिघांचे रक्तनमुने, इतरांची होणार चौकशी

त्यातूनच दोघांनीही पळून जाऊन नुकतेच लग्न केले होते. त्याचा राग इस्माईलच्या मनात होता. सोमवारी दुपारी दीड वाजता इस्माईल व त्याचा मित्र संकेत गुप्ता हे दोघे कठाळू यांच्या घराजवळ आले. दोघांनी कठाळू लहाडे यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने लहाडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर पोलिसांनी इस्माईल व संकेत या दोघांना तत्काळ अटक केली.

बहिणीला पळवून नेल्यामुळे तरुणाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून खून केला. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक केली आहे.
-रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()