PDCC Crop Loan
PDCC Crop Loan Sakal

PDCC Crop Loan : खरिपासाठी १९४८ कोटींचे पीक कर्ज; PDCC बॅंकेतर्फे वाटप, 2 लाख शेतकऱ्यांना फायदा

Apply for Crop Loan Scheme : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात २५८ कोटी ४३ लाख ५८ हजार रुपयांचे अधिकचे पीक कर्जवाटप झाले आहे.
Published on

Pune : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत (ता. २५) एक हजार ९४७ कोटी ४१ लाख ८८ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. या पीक कर्जाचा पुणे जिल्ह्यातील २ लाख १ हजार ६३३ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात २५८ कोटी ४३ लाख ५८ हजार रुपयांचे अधिकचे पीक कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी १ एप्रिल २०२४ पासून पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली असून, ३० सप्टेंबरपर्यंत या पीक कर्जाचे वाटप केले जाणार आहे.

जिल्हा बॅंकेने खरीप हंगामातील पिकांसाठी यंदा २ हजार ५६ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानुसार जिल्ह्यातील मागेल त्या पात्र शेतकऱ्यांना या पीक कर्जाचा लाभ दिला जाणार आहे.

शिवाय यावर्षीही तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजाची योजना चालू ठेवण्यात आली आहे. मागील १५ वर्षांपासून पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले जात असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी मंगळवारी (ता. २५) सांगितले.

जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज दृष्टीक्षेपात
२ हजार ५६ कोटी २८ लाख रुपये
खरिपासाठी पीक कर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट

१ हजार ९४७ कोटी ४१ लाख ८८ हजार रुपये
आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप

२ लाख १ हजार ६३३
पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी

१ लाख ६१ हजार २२०.१९ हेक्टर
पीक कर्जाचा लाभ झालेले क्षेत्र

तालुकानिहाय पीक कर्जवाटप (रुपयांत)
- आंबेगाव --- १५४ कोटी २९ लाख ८६ हजार
- बारामती --- २४१ कोटी ४० लाख ४७ हजार
- भोर --- ९५ कोटी ६८ लाख ७२ हजार
- दौंड --- २६८ कोटी २९ लाख ३२ हजार
- हवेली --- ७२ कोटी ७९ लाख ८३ हजार
- इंदापूर --- १२८ कोटी ६५ लाख १७ हजार
- जुन्नर --- २३० कोटी २३ लाख ६५ हजार
- खेड --- २१२ कोटी ७० लाख ७१ हजार
- मावळ --- ४६ कोटी ५७ लाख ८१ हजार
- मुळशी --- २६ कोटी ७७ लाख २५ हजार
- पुरंदर --- १७८ कोटी ६१ लाख १५ हजार
- शिरूर --- २७६ कोटी १७ लाख ६८ हजार
- वेल्हे --- १५ कोटी २० लाख २५ हजार

जिल्हा बँकेने खरीप हंगामातील पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५४ कोटी ६३ लाख रुपयांनी वाढ केली आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. मागेल त्या सर्व पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज दिले जात असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरिपात आतापर्यंत २५८ कोटी ४३ लाख ५८ हजार रुपयांचे अधिकचे पीक कर्ज वाटप झाले आहे.
- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष, जिल्हा बँक, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.