ओतूर व परीसरातील गावांमध्ये दहिहंडी उत्सव उत्साहात साजरा

otur dahihandi
otur dahihandiesakal
Published on

ओतूर ता.जुन्नर येथील शहरात व परीसरातील उदापूर,डिंगोरे,पिंपळगाव जोगा व इतर गावामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव,गोपाल काला आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बालगोपाला सह गोंविदाचा उत्साहा शिगेला पोहोचला होता.तसेच वरूण राज्याच्या आगमनाने वातावरण अल्हाददायक झाले होते.

ओतूर शहरातील जुने बसस्थानक चौकात मोहित ढमाले युवा मंच आयोजित ओतूरची मानाची दहीहंडी उभारण्यात आली होती.या दहिहंडी उत्सवाला आणि हंडीला ओतूर शहरातील मुख्यत्वे करून तीन गोविंदा पथकांनी सलामी दिली.

त्यात जय मल्हार गोविंदा पथक काळे वस्ती,बाल गोविंदा पथक,ओतूर व ओतूर चा गोविंदा पथक हे असून सदर गोंविदा पथके ओतूर शहरातीलच नाही तर तालुक्यातील विविध ठिकाणी फिरून दहिहंडी ना सलामी देऊन हंड्या फोडतात.ओतूर शहरातील या दहिहंडी पथकांचा तालुक्यात नावलौकिक आहे.

गोपाळकाल्या निमीत्त लावण्यात आलेली ओतूर शहरातील रोख रक्कम ५५ हजार५५५ रूपये बक्षिस असलेली मानाची दहीहंडी जुने बसस्थानक चौकात मोहित ढमाले युवा मंच कडून उभारण्यात आली होती.

या दहिहंडीला फोडण्यासाठी चिठ्ठीवर नाव काढण्यात येऊन ओतूर चा गोविंदा पथक यांनी ती संधी देण्यात आली.यावेळी सर्व पथकातील गोविंदानी तसेच नागरीकांनी मोठी गर्दी करून गोविंदा आलारे आला गोकुळात आनंद झाला या व इतर गितावर आणि डि जे च्या तालावर ठेका धरला होता.तसेच उत्सव काळात ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.