सिमला मिरची, शेवग्याच्या भावात घट

सिमला मिरची, शेवग्याच्या भावात घट

Published on

मार्केट यार्ड, ता. १६ : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे मार्केटयार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेने कमी झाली होती. परिणामी मटार, तोतापुरी कैरीच्या भावात दहा ते वीस टक्के वाढ झाली होती. तर मागणी वाढल्याने सिमला मिरची, शेवग्याच्या भावात घट झाली असून इतर सर्वप्रकारच्या फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.
गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (ता. १६) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात येथून सुमारे सहा ते सात टेंपो हिरवी मिरची, कर्नाटक येथून तीन ते चार टेंपो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून तीन ते चार टेंपो शेवगा, कर्नाटक येथून घेवडा दोन टेंपो, हिमाचल प्रदेश येथून एक ट्रक गाजर, कर्नाटकातून तोतापुरी कैरी चार टेंपो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे १४ ते १५ टेंपो इतकी आवक झाली होती, तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ७०० ते ८०० गोणी, गवार पाट ते सहा टेंपो, भेंडी पाट ते सहा टेंपो, टोमॅटो सुमारे नऊ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची तीन ते चार टेंपो, काकडी आठ ते १० टेंपो, फ्लॉवर १० ते १२ टेंपो, कोबी चार ते पाच टेंपो, सिमला मिरची १० ते १२ टेंपो, शेवगा तीन ते चार टेंपो, गाजर सहा ते सात टेंपो, मटार १००, तांबडा भोपळा आठ ते १० टेंपो, कांदा सुमारे १०० ते ११० ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव - कांदा : ६०-९०, बटाटा : ८०-१५०. लसूण : २५०-७००, आले : ७००-८००, भेंडी : ३००- ४५०, गवार : गावरान व सुरती ७००-८००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : ३००-४००, काकडी : १००-१६०, कारली : हिरवी ३००-३२०, पांढरी : २४०-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : ५००-५५०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : १००-१५०, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : २००-३५०, तोंडली : कळी २८०-३००, जाड : १५०-१६०, शेवगा : १५०-२५०, गाजर : १००-१५०, वालवर : ३००-३५०, बीट : ७०-८०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : स्थानिक ७५०-९५०, पावटा :६००- ६५०, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी - २००-२८०, कैरी गावरान : २००-२२०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथींबीर, मेथी भावात वाढ
गारपीट, अवकाळी पावसामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने कमी झाली होती. परिणामी मेथी आणि कोथिंबिरीच्या भावात शेकड्यामागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली होती. तर इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते. किरकोळ बाजारात मेथी, कोर्थिंबिरची एक गड्डीची २० ते ३० रुपयांपर्यंत तर इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची विक्री १५ ते २० रुपयांपर्यंत विक्री केली जात होती. मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची एक लाख जुडींची आवक झाली, तर मेथीची ५० हजार जुडी इतकी आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-१२००, मेथी : ८००-१३००, शेपू : ४००-७००, कांदापात : ४००-८००, चाकवत : ३००-६००, करडई : ३००- ५००, पुदीना : २००-५००, अंबाडी : ३००-७००, मुळे : ४००-७००, राजगिरा : ३००-६००, चुका : ३००-७००, चवळई : ३००-५००, पालक : ४००-८००.

लिंबू गोणी मागे १०० ते १५० रुपयांनी घट
फळबाजारत रविवारी खरबूज, पपई दोन ते तीन रुपये वाढ झाली. संत्राच्या भावात ही २० टक्क्यांनी वाढ झाली. तर डाळिंब दहा टक्के, चिक्कू ५० रुपये घट, लिंबू गोणी मागे १०० ते १५० रुपयांनी भावात घट झाली.
रविवारी (ता. १६) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, संत्री १५ ते २० टन, मोसंबी ३० ते ४० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई सात ते आठ टेंपो, लिंबांची सुमारे एक हजार

२०० ते एक हजार ५०० गोणी, कलिंगड ८ ते १० टेंपो, खरबूज सात ते आठ टेंपो, पेरू २०० ते ३०० क्रेट, चिक्कू दीड हजार डाग इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १०००-१५००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४००, (४ डझन) : १००-२२०, संत्री : (१०किलो) : ५००-१४००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१६०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-५०, कलिंगड : १०-१२, खरबूज : १५-२५, पपई : १५-२५, अननस (एक डझन) : १००-५००, पेरू (वीस किलो) : ३००-४००, चिक्कू (दहा किलो) : १००-४००.

अवकाळी पावसाचा फुलांना फटका
मार्केट यार्ड : अवकाळी पावसाचा फुलांना जोरदार फटका बसल्याने दरात ५० टक्के घसरण झाली आहे. झेंडूच्या फुलात ५० टक्के नी घसरण झाली असून बाकी इतर फुलांचे दर २० टक्क्यांनी घटले आहेत. सध्या सण, उत्सव नसल्याने फुलांना मागणी कमी असल्याने फुलांच्या दरात ही घसरण झाली असल्याचे फुल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १० ते १५ गुलछडी : ३० ते ६०, अष्टर : जुडी १० ते २०, सुट्टा ५० ते १००, कापरी : २० ते ३०, शेवंती : ५०ते ८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ८० ते १००, जरबेरा : १५ ते २० , कार्नेशियन : ४० ते ६०, शेवंती काडी १२० ते १५०, लिलियम (१० काड्या) ५०० ते ६००, ऑर्चिड ३५० ते ४००, ग्लाडिओ (१० काड्या) : ४० ते ५० , जिप्सोफिला : ८० ते १२० , मोगरा : २०० ते ३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.