कांदा, हिरवी मिरची, वांगी, सिमला मिरची स्वस्त

कांदा, हिरवी मिरची, वांगी, सिमला मिरची स्वस्त

Published on

मार्केट यार्ड, ता. ५ : गेल्या आठवड्याच्या तुलनेने बाजारात रविवारी फळभाज्यांची आवक वाढली. परिणामी कांदा, हिरवी मिरची, वांगी, सिमला मिरचीच्या भावात १० ते २० टक्के घट झाली. इतर बहुतांश भाजीपाल्यांचे भाव टिकून होते.
गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मध्यप्रदेश, कर्नाटक येथून हिरवी मिरची १५ टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी चार टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडूतून तीन टेम्पो शेवगा, इंदूर येथून दोन टेम्पो गाजर, बेळगाव येथून घेवडा चार टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून एक ट्रक मटार, कर्नाटकातून पावटा तीन टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची १० टेम्पो आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले ७०० गोणी, भेंडी सहा टेम्पो, गवार सहा टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची १० टेम्पो, हिरवी मिरची १० टेम्पो, काकडी आठ टेम्पो, फ्लॉवर १२ टेम्पो, कोबी पाच टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पो, गाजर पाच टेम्पो, भुईमूग शेंगा १२५ गोणी, पावटा दोन टेम्पो, मटार २० गोणी, तांबडा भोपळा १२ टेम्पो, कांदा १०० ट्रक, इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ४५ ट्रक आवक झाली, अशी माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे १० किलोचे भाव- कांदा : ३००-४००, बटाटा : १००-२००, लसूण : १०००-१८००, आले सातारी : ९००-९५०, भेंडी : ३००-४५०, गवार : गावरान व सुरती ः ३००-५००, टोमॅटो : १००-१२०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधीभोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २००-३००, कारली : हिरवी ः २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : ४००-४५०, पडवळ : १००-१५०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ८०-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ः ३००-३५०, जाड : १५०-२००, शेवगा : ८००-१०००, गाजर : २००-३००, वालवर : ४००-४५०, बीट : १४०-१५०, घेवडा : ३५०-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ६००-७००, मटार : १४००-१४५०, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

पालेभाज्यांचे भाव वाढले
घाऊक बाजारात कोथिंबिरीची एक लाख ५० हजार जुडी, तर मेथीची ८० हजार जुडी आवक झाली. मागणी वाढल्याने मेथी, कोथिंबीर, चाकवत, शेपू, मुळे, पालक आदी पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली तर, आवक वाढल्याने चुका, करडई, चवळई, पुदिना आदी पालेभाज्यांचे भाव स्थिर होते.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-२०००, मेथी : ८००-१६००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ४००-८००, चवळई : ३००-७००, पालक : ८००-१८००.

चिक्कू, सीताफळ, डाळिंबाच्या भावात घट
फळबाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात झाली. त्यामुळे सीताफळ, चिक्कू, मोसंबी, डाळिंबाच्या भावात १० टक्क्यांनी घट तर लिंबाच्या गोणीमागे २०० ते ३०० रुपये घट झाली. मागणी वाढल्याने पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली. इतर बहुतांश सर्व फळांची आवक-जावक सारखी असल्याने त्यांचे भाव स्थिर होते.
येथील फळबाजारात केरळ येथून अननस पाच ट्रक, मोसंबी ८० टन, संत्रा ४० टन, डाळिंब ४५ टन, पपई चार टेम्पो, लिंबांची सुमारे १५०० गोणी, कलिंगड आठ टेम्पो, खरबूज चार टेम्पो, पेरू १५० क्रेट्स, सीताफळ ३० टन, चिक्कू दोन हजार बॉक्स, सफरचंदाच्या चार हजार पेट्यांची आवक झाली, अशी माहिती व्यापाऱ्‍यांनी दिली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन) : १३०-२८०, (४ डझन) : ३०-१२०, संत्रा : (१० किलो) : २००-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२००, गणेश : १०-३०, आरक्ता ः २०-६०, कलिंगड : ८-१२, खरबूज : १५-२५, पपई : ७-३०, सीताफळ ः २० ते ८०, पेरू (२० किलो) : ५००-७००, चिक्कू (१० किलो) : १००-४००, द्राक्ष (५ किलो) : ६००-७००, सफरचंद : कश्मीर डेलिशियस (१५ ते १६ किलो) ः १४००-१८००, सिमला (२५ ते ३० किलो) ः २८००-३२००, किन्नोर (१० किलो) : १८००-२२००.

फुलांच्या भावात पुन्हा घसरण
फूलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. मात्र, मागणीअभावी फुलांच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. दिवाळीत फुलांचे भावात तेजीत येण्याचा अंदाज आडतदार सागर भोसले यांनी वर्तविला आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : ३०-६०, अ‍ॅष्टर : जुडी ः ५-१०, सुट्टा ः ५०-८०, कापरी : १०-२०, शेवंती : २०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ४०-८०, शेवंती काडी ः ८०-१२०, लिलियम (१० काड्या) ः ८००-१०००, ऑर्चिड ः ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : २००-३००.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.