कांदा, मिरची, फ्लॉवर, कोबी, घेवडा, मटारच्या भावात घट

कांदा, मिरची, फ्लॉवर, कोबी, घेवडा, मटारच्या भावात घट

Published on

मार्केट यार्ड, ता. २६ : मार्केटयार्डमध्ये रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली. परिणामी कांदा, हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची, घेवडा, मटार आणि पावट्याच्या भावात घट झाली. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटकातून हिरवी मिरची १५ टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी चार टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडूतून शेवगा तीन टेम्पो, राजस्थान येथून गाजर १० टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सहा टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग शेंगा दोन टेम्पो, मध्य प्रदेश येथून मटार २५ ट्रक, मध्यप्रदेश येथून लसूण आठ टेम्पो, कर्नाटकातून पावटा तीन टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ७०० गोणी, भेंडी आठ टेम्पो, गवार आठ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची पाच टेम्पो, काकडी आठ टेम्पो, फ्लॉवर १२ टेम्पो, कोबी सहा टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पो, गाजर चार टेम्पो, पावटा सात टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, कांदा जुना आणि नवीन सुमारे १०० ट्रक, इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ३५ टेम्पो आवक झाली, अशी माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव- कांदा : २५०-३५०, बटाटा : १३०-१७०, लसूण : १४००-२५००, आले सातारी : ८००-९००, भेंडी : ३००-५००, गवार : गावरान व सुरती : ४००-६००, टोमॅटो : १५०-२५०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २५०-२६०, दुधी भोपळा : ८०-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२५०, कारली : हिरवी १००-१५०, पांढरी : १००-१५०, पापडी : २५०-३००, पडवळ : १००-१५०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ४०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी : ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ६००-८००, गाजर : २००-४००, वालवर : २५०-३००, बीट : १५०-१६०, घेवडा : २५०-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ६००-७००, मटार : ३००-३२०, पावटा : २५०-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथींबीर, मेथी, कांदापात स्वस्त
मार्केटयार्डात कोथींबीर, मेथी, कांदापात, मुळे, राजगिरा आणि चवळईच्या भावात घट झाली असून शेपू, चाकवत, करडई, पुदीना, अंबाडी, चुका आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिरीची एक लाख ७५ हजार तर मेथीची एक लाख जुडी आवक झाली. घाऊक बाजारात शेकड्यामागे कोथींबीर, मेथी, कांदापात आणि मुळ्याच्या भावात प्रत्येकी २०० रुपयांनी तर राजगिरा आणि चवळईच्या भावात १०० रुपयांनी घट झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ४००-१०००, मेथी : ४००-८००, शेपू : ६००-१०००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-७००, पुदीना : ३००-६००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ६००-१०००, राजगिरा : ४००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१५००.

डाळिंब, पपई, बोरांच्या भावात घट
येथील फळबाजारात डाळिंब, पपई आणि बोरांच्या भावात घट झाली असून लिंबू, अननस, संत्रा, मोसंबी, कलिंगड, खरबूज, सीताफळ, चिक्कू आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. केरळ येथून अननस नऊ ट्रक, मोसंबी ७० टन, संत्रा ५० टन, डाळिंब ४० टन, पपई ४० टेम्पो, लिंबू १५०० गोणी, कलिंगड आठ टेम्पो, खरबूज सहा टेम्पो, सीताफळ ६० टन, चिक्कू दोन हजार बॉक्स आणि बोरांची ४० टन आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : २००-५५०, मोसंबी : (३ डझन) : १५०-३८०, (४ डझन) : ८०-१८०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : गणेश : १०-३०, आरक्ता : १०-४०, कलिंगड : १०-१४, खरबूज : १५-२५, पपई : ८-१६, चिक्कू (१० किलो) : १००-५००, सीताफळ (एक किलो) : २०-१००, पेरू (२० किलो) : ४००-५००, बोरे (१० किलो) चमेली : २५०-२८०, उमराण : १२०-१४०, चेकटन : ६००-७००, चण्यामण्या : ६००-७००.

शोभीवंत फुले महागली
लग्नसराई सुरु झाल्याने डेकोरेशनसाठी शोभीवंत फुलांना मागणी असते. त्यामुळे भाव वाढले आहेत.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-६०, गुलछडी : २०-४०, अ‍ॅष्टर : जुडी : ८-१५, सुट्टा : ५०-१२०, कापरी : २०-४०, शेवंती : २०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-५०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी : १००-२५०, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०, जिप्सोफिला : ३००-५००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.