बटाटा, लसूण, टोमॅटो, काकडी, शेवगा स्वस्त

बटाटा, लसूण, टोमॅटो, काकडी, शेवगा स्वस्त

Published on

मार्केट यार्ड, ता. ३ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढून सुमारे १०० ट्रक झाली होती. आवक जास्त आणि तुलनेने मागणी कमी असल्याने बटाटा, लसूण, टोमॅटो, काकडी, शेवग्याच्या भावात घट झाली. इतर बहुतांश भाजीपाल्याचे भाव स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची १२ टेम्पो, गुजरात, कर्नाटकातून पाच टेम्पो कोबी, घेवडा, पावटा प्रत्येकी चार टेम्पो, तर भुईमूग शेंगांची दोन टेम्पो आवक झाली. आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून शेवगा सहा टेम्पो, राजस्थानमधून गाजर १० ट्रक तर मटार सात ट्रक, मध्य प्रदेश येथून लसणाची १४ टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ६०० गोणी, भेंडी व गवार प्रत्येकी आठ टेम्पो, टोमॅटो १३ हजार क्रेट, हिरवी मिरची पाच टेम्पो, कोबी सहा टेम्पो, सिमला मिरची चार टेम्पो, फ्लॉवर १५ टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, शेवगा दोन टेम्पो, घेवडा पाच टेम्पो, मटार एक टेम्पो, कांदा १०० ट्रक, इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ४५ टेम्पो आवक झाली.

फळभाज्यांचे दहा१० किलोंचे भाव-
कांदा : १३०-१८०, बटाटा : १००-२००, लसूण : ७००-१३००, आले सातारी : ८५०-९००, भेंडी : ३००-५००, गवार : गावरान : ५००-७००, टोमॅटो : १००-१३०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : ४००-५००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-३००, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी : २५०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१३०, कोबी : १२०-१८०, वांगी : १५०-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ५००-५५०, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ३००, गाजर : १००-१४०, वालवर : २५०-३००, बीट : १५०-१८०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ७००-७५०, मटार : स्थानिक : ६००, परराज्य : ३००-५००, पावटा : ४००-४५०, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी : ७००-८०० सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.


कोथींबीर, मेथी, शेपू, चुक्याच्या भावात घट
मार्केटयार्डात कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात, करडई, पुदीना आणि चुक्याच्या भावात घट झाली असून चाकवत, अंबाडी, मुळे, राजगिरा, चवळई, पालक आणि हरभरागड्डीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
कोथिंबिरीची दीड लाख जुडी तर मेथीची एक लाख जुडींची आणि हरभऱ्याची पाच हजार गड्डींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात गड्डीमागे पाच रुपयांनी घट झाली. तसेच शेपू आणि कांदापातीच्या भावात चार रुपये, पुदीना तीन रुपये, मेथी आणि चुका प्रत्येकी दोन रुपये तर करडईच्या भावात एक रुपयांनी घट झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ३००-८००, शेपू : ३००-६००, कांदापात : ४००-८००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-६००, पुदीना : २००-५००, अंबाडी : ३००-७००, मुळे : ६००-१०००, राजगिरा : ४००-७००, चुका : ४००-८००, चवळई : ३००-७००, पालक : ८००-१५००, हरभरा गड्डी : ८००-१५००.

डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू स्वस्त
फळबाजारात डाळिंब, चिक्कू, पेरू आणि लिंबू स्वस्त झाले असून कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात वाढ झाली आहे. अननस, सफरचंद आणि किन्नूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
केरळ येथून अननस सात ट्रक, मोसंबी ६५ टन, संत्रा ८० टन, डाळिंब ३५ टन, पपई १० टेम्पो, लिंबांची १२०० गोणी, कलिंगड १० टेम्पो, खरबूज २० टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, सफरचंदाची १२०० बॉक्स आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ३००-६००, अननस (१ डझन) : १००- ६००, मोसंबी : (३ डझन) : ११०- ५५०, संत्रा
: (१० किलो) : १५०-५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१५०, गणेश : ५-३०, आरक्ता : १०-६०, कलिंगड : ६-१६, खरबूज : १५-२५, पपई : ८-२५, चिक्कू (१० किलो) : १००-४००. सफरचंद : कश्मीर डेलिशियस (१५ ते १६ किलो) : ११००-१४००, (किन्नोर २५ ते ३० किलो) : २०००-३०००, किन्नू : (२० ते २२ किलो) : ५५०-७००, पेरू (२० किलो) : ३००-४००.

फुलांच्या भावात घसरण
बाजारात रविवारी फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली; मात्र तुलनेने मागणी कमी असल्याने भावात २० ते ३० टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव : झेंडू : २०-३०, गुलछडी : ५०-८०, अ‍ॅष्टर : जुडी : १५-२५, सुट्टा : १००-१२०, कापरी : २०-४०, शेवंती : ६०-८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१२०, शेवंती काडी १२०-१५०, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, आॅर्चिड : ३००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : १००-२००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.