लसूण, काकडी, फ्लॉवर, गाजर, शेवगा, कैरी स्वस्त

लसूण, काकडी, फ्लॉवर, गाजर, शेवगा, कैरी स्वस्त

Published on

मार्केट यार्ड, ता. ३१ : सध्या उन्हाळा वाढत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शेतमालाचे उत्पादन घटू लागले आहे. परिणामी बाजारपेठांत भाजीपाल्याची आवक घटत आहे. मात्र, रविवारी (ता. ३१) गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, घेवडा आणि मटारच्या भावात वाढ झाली असून लसूण, काकडी, फ्लॉवर, गाजर, शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात घसरण झाली असून अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
मार्केटयार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १२ टेम्पो, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून तोतापुरी कैरी प्रत्येकी पाच टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून कोबी प्रत्येकी पाच टेम्पो, कर्नाटकातून घेवडा तीन टेम्पो व भुईमूग शेंगांची दोन टेम्पो आवक झाली. आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा सात टेम्पो, राजस्थानमधून गाजर सहा ट्रक, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथून मटार पाच टेम्पो, तर मध्यप्रदेशातून लसणाची आठ टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले सुमारे ६०० गोणी, भेंडी १० टेम्पो, गवार सात टेम्पो, टोमॅटो १२ हजार क्रेट, हिरवी मिरची पाच टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पो, कोबी पाच टेम्पो, फ्लॉवर १२ टेम्पो, तांबडा भोपळा आठ टेम्पो, शेवगा चार टेम्पो, मटार पारनेर १२ टेम्पो, काकडी आठ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाट्याची २५ टेम्पो आवक झाली अशी माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे १० किलोंचे भाव- कांदा : १३०-१६०, बटाटा : १५०-२५०, लसूण : ६५०-१४००, आले सातारी : १०००-१०५०, भेंडी : २००-४००, गवार : गावरान : ४००-६००, सुरती : ४००-६००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : ८०-१५०, कारली : हिरवी : ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१६०, वांगी : २००-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी : ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : १००-१५०, गाजर : १००-१८०, वालवर : ४००-४५०, बीट : १००-१२०, घेवडा : ५००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग शेंग : ७००, मटार : स्थानिक : ६००-६५०, पावटा : ५००-५५०, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी : २००-४०० सुरण : ४००-५००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे भाव स्थिर
मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची दीड लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली. दरम्यान बहुतांश
पालेभाज्यांचे भाव टिकून आहेत.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १०१०-१५००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-६००, पुदिना : ४००-७००, अंबाडी : ३००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१५००.

चिक्कू, पेरू, डाळिंबाच्या भावात घसरण
फळबाजारात डाळिंब, चिक्कू आणि पेरूच्या भावात घट झाली असून संत्रा आणि कलिंगडाच्या भावात वाढ झाली आहे. लिंबू, अननस, मोसंबी, खरबूज आणि पपईचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळबाजारात रविवारी मोसंबी ६० टन, संत्री ४० टन, डाळिंब २५ टन, पपई २० टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ५०० गोणी, कलिंगड २५ टेम्पो, खरबूज १२ टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, पेरू ७०० क्रेटची आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१६००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५०, (४ डझन) : ५०-१७०, संत्रा : (१० किलो) : ३००-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१५०, आरक्ता : १०-४०, गणेश : ५-३०, कलिंगड : ८-१६, खरबूज : १५-२८, पपई : ८-१२, चिक्कू (१० किलो) : १००-४००. पेरू (२० किलो) : ३००-५००.


फुलांचे भाव घटले

फूलबाजारात रविवारी फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून घटलेले दर स्थिरच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२५, गुलछडी : १००-१५०, अ‍ॅष्टर : जुडी : १०-१५, सुट्टा : १००-१२०, कापरी : १०-३०, शेवंती : ८०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ३०-८०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-१२०, शेवंती काडी : १५०-२००, लिलियम (१० काड्या) : ८००-९००, आॅर्चिड : ३००-४५०, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : ५०-१००, मोगरा : २५०-३००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.