खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोल वसुली ठेकेदार कंपनी बदलली

व्ही. के. एंटरप्रायजेस कंपनीला ठेका
toll collection company at khed-shivapur toll naka changed
toll collection company at khed-shivapur toll naka changed Sakal Media
Updated on

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलवसुली व्यवस्थापन ठेकेदार कंपनी बदलण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या व्ही. के. एंटरप्रायजेस या कंपनीला हा ठेका देण्यात आला आहे. गुरुवारी व्ही. के. एंटरप्रायजेस या कंपनीने टोल व्यवस्थापनाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. यापूर्वी खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलवसुली व्यवस्थापनाचा ठेका अशोका स्थापत्य या कंपनीकडे होता. मार्च 2021 अखेरीस अशोका स्थापत्य या कंपनीच्या टोलवसुली ठेक्याची मुदत संपली. या पार्श्वभूमीवर खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोलवसुलीचा ठेका कोणाला द्यायचा? याची प्रक्रिया सुरू होती.

toll collection company at khed-shivapur toll naka changed
ऐकावं ते नवलंच! बोकडासाठी व्यावसायिक कोर्टात; पोलिसांविरोधातच दाखल केला दावा

अखेर पुणे-सातारा टोल रोड कंपनीने खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलवसुली व्यवस्थापनाचा ठेका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या व्ही. के. एंटरप्रायजेस या कंपनीला देण्यात आला आहे. गुरुवारी व्ही. के. एंटरप्रायजेस या कंपनीने टोलवसुली व्यवस्थापनाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली.

toll collection company at khed-shivapur toll naka changed
वरवंड येथील तिघांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

पुण-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, "खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोल वसुली व्यवस्थापन कंपनी बदलण्यात आली आहे. नवनाथ पारगे यांच्या व्ही. के. एंटरप्रायजेस या कंपनीला पुढील एक वर्षांसाठी टोल वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. नवनाथ पारगे म्हणाले, "मी आणि विजय कटके भागीदार असलेल्या व्ही. के. इंटरप्रायजेस या कंपनीला खेड-शिवापूर टोलनाका टोल वसुलीचा ठेका मिळाला आहे. टोल नाक्यावर टोल कर्मचारी प्रवाशांशी उद्धट वागणार नाहीत, तसेच प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन टोल व्यवस्थापन करण्यात येईल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.