शिवाजीनगर मतदारसंघात या वेळी अटीतटीचा सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून इच्छुकांची फौज सध्या तयार आहे. तर वंचित बहुजन विकास आघाडीच्या हालचाली थंडावल्या आहेत..२०१४ मध्ये भाजपकडून विजय काळे हे उमेदवार होते. काँग्रेसमधून माजी आमदार विनायक निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार अनिल भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर आयत्या वेळी शिवसेनेकडून माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माजी नगरसेवक राजू पवार हेदेखील रिंगणात उतरले होते. अशा पंचरंगी लढतीत भाजपचे विजय काळे जवळपास वीस हजार मतांच्या फरकाने निवडून येऊन त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्याला सुरूंग लावला. . भाजपचे फिक्स मतदार (सोसायटी भाग) काळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते, तर झोपडपट्टी भागातील मतांची विभागणी निम्हण, भोसले, एकबोटे, पवार यांच्यात झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मत विभागणीचा फायदा काळे यांना झाला..२०१४ मध्ये उमेदवारांना मिळालेली मतेउमेदवार-पक्ष-मिळालेली मते- विजय काळे-भाजप-५६,४३०- विनायक निम्हण-काँग्रेस-३४४१३- अनिल भोसले-राष्ट्रवादी-२४१७३- मिलिंद एकबोटे-शिवसेना-१४६६२.Kothrud Assembly Election : कोथरूडमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का कोण देणार?.२०१९ मध्ये माजी खासदार पुत्र, तत्कालीन नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे भाजपकडून उमेदवार होते, तर माजी नगरसेवक दत्ता बहिरट काँग्रेसकडून रिंगणात होते. शिरोळे व बहिरट यांच्यात थेट लढत मानली जात असली तरी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अनिल कुऱ्हाडे यांनी मिळवलेली मते काँग्रेसच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरली. वंचितमुळे भाजपचा उमेदवार विजयी होण्यासाठी चांगलाच फायदा झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुहास निम्हण यांना थोडक्याच मतदारांनी पसंती दर्शवली..मतदारसंघात स्व:ताचे वर्चस्व असलेले माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार विनायक निम्हण, माजी आमदार अनिल भोसले हे युतीचे उमेदवार शिरोळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव अनंद छाजेड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे तसेच काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांना फोडण्यात शिरोळे यशस्वी ठरले. अशा वेळी काँग्रेसच्या फुटलेल्या प्रस्थापित नावामुळे काँग्रेसचे उमेदवार बहिरट हतबल झाले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद बहिरट यांच्या पाठिशी उभी राहिली. मात्र ती विजयापर्यंत पोहोचू शकली नाही. आयत्यावेळी काँग्रेसची मंडळी भाजपच्या गळाला लागल्याने शिरोळे पाच हजार मताच्या फरकाने विजयी झाले..२०१९ मध्ये उमेदवारांना मिळालेली मतेउमेदवार-पक्ष-मिळालेली मते- सिद्धार्थ शिरोळे-भाजपा + शिवसेना-५८७२७- दत्ता बहिरट-काँग्रेस+ राष्ट्रवादी-५३६०३- अनिल कुऱ्हाडे-वंचित ब. आ -१०४५४- सुहास निम्हण -मनसे -५२७२.बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला.२०२४ विधानसभा निवडणूक खूप रंगतदार होईल, अशीच चर्चा आहे. शहरामध्ये शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. विधान परिषद माजी आमदार दीप्ती चवधरी, मागील वेळी चुरशीची लढत देणारे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक मनीष आनंद, दिवंगत आमदार विनायक निम्हण याचे चिरंजीव सनी निम्हण हे चार उमेदवार काँग्रेस पक्षातून प्रमुख दावेदार आहेत. भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे, निवेदिता एकबोटे, अॅड. मधुकर मुसळे, संदीप काळे, बाळासाहेब अमराळे हे इच्छुक आहेत..महायुती व महाविकास आघाडीचा उमेदवार यांच्यामध्ये थेट लढत होऊ शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रणजित शिरोळे हेदेखील तयारीला लागले आहेत. मागील वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने दहा हजारांपेक्षा जास्त मते मिळवली होती, त्या पक्षाचा या वेळी काही गाजावाजा दिसून येत नाही. निवडणुकीसाठी विविध पक्षांतून इच्छुक असणारे उमेदवार स्व:ला तिकीट मिळणार या आत्मविश्वासाने तयारीला लागले आहेत. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार मनीष आनंद यांनी गुडलक चौकात पक्षाचे संपर्क कार्यालय सुरू करून जोरदार तयारी केली आहे. बहिरट, चवधरी, निम्हण तिकीटाची घोषणा होईल याची वाट पाहत आहेत. .Assembly Election: आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना दणका! अहवाल सादर करण्याचा दिला आदेश, प्रकरण काय?.विद्यमान आमदार शिरोळे यांनी शेवटच्या टप्प्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा धडाका लावला आहे. मुसळे सार्वजनिक कार्यक्रमातून जनतेसमोर जात आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.