पीएमपीची पर्यटन बससेवा क्रमांक २ सुरू

पीएमपीची पर्यटन बससेवा क्रमांक २ सुरू

Published on

पुणे, ता. १० ः पीएमपीच्या पर्यटन बस क्रमांक २चा रविवारी स्वारगेट बसस्थानक येथे प्रारंभ झाला. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते बस सेवेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे, स्वारगेट आगार व्यवस्थापक शैलेश नाईक आदी उपस्थित होते.
हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकावळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर या मार्गे ही बस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या भागातील पर्यटन स्थळांवर जाता येणार आहे. ही बस दर शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही बस धावणार आहे. प्रति प्रवासी तिकीट दर ५०० रुपये असणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.