Bee Attack : किल्ले राजगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सर्व पर्यटक सुस्थितीत, मोठा अनर्थ टळला.
Bee Attack rajgad fort
Bee Attack rajgad fortSakal
Updated on

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने बारा ते पंधरा पर्यटक जखमी झाले होते. यामधील चार जणांची प्रकृती चिंताजनक होती परंतु प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे किल्ल्यावर जाऊन वैद्यकीय मदत दिल्याने सर्व पर्यटक सुस्थितीत आल्याने मोठा अनर्थ टळला.

सदरची घटना रविवार (ता.८) रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पर्यटकांनी स्वतःच्या अंगावर मारलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे येथील मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांनी दिली. यामध्ये शुभम सावंत, रोहित शर्मा, हिना पटेल ,अपूर्वा देशमुख राहणार मुंबई यांच्यासह आठ ते दहा ( इतर किरकोळ जखमी पर्यटकांची नावे कळू शकली नाहीत).पर्यटक जखमी झाले होते.

स्थानिकांकडून मिळाल्या माहितीनुसार पर्यटकांमध्ये मुंबई तसेच पुणे येथील सोळा जणांचा ग्रुप किल्ले राजगड पर्यटनासाठी आला असता हा ग्रुप किल्ले भ्रमण करत असताना सुवेळा माची जवळ कडेच्या कातर खडकातील भल्या मोठ्या मधमाशांचे पोळी आहेत.

या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी अंगावर मारलेल्या सुगंधी द्रव्यामुळे (सेंट ,परफ्युम) मुळे तेथील पर्यटकांवर हल्ला केला यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांना अधिक मधमाशा चावल्यामुळे या चार जणांची प्रकृती चिंताजनक होती तर इतर पर्यटक किरकोळ जखमी झाले आहे .

झालेले घटनेची माहिती पर्यटकांनी पुणे कंट्रोल रूमला दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने वेगवान हालचाली केल्या यामध्ये प्रामुख्याने भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांना योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या नंतर तात्काळ तहसीलदार पारगे यांनी १०८ नंबरच्या ॲम्बुलन्स चे डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य पथक घटनास्थळी पाठवण्याचा सूचना दिल्या.

तर पठारे यांनी कॉन्स्टेबल व होमगार्ड किल्ल्याकडे रवाना केले. दरम्यान किल्ल्यावरील पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे, विशाल पिलावरे ,आकाश कचरे, पवन साखरे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील ,गणेश चंदनशिव ,होमगार्ड विजय गोहिने व इतर पर्यटकांच्या मदतीने जखमींना सुवेळा माची वरून राज सदरे कडे आणण्यासाठी धाव घेतली.

गडावरून पर्यटक खाली आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याने वैद्यकीय पथकाला किल्ल्यावर बोलवण्यात आले. दरम्यान वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राहुल बोरसे ,किकवी येथील डॉ. मंदार माळी, खेडशिवापूर येथील डॉ. बाळासाहेब मोटे यांनी गडावरील पर्यटकांवर उपचार केल्याने मोठा अनर्थ टळला.

तर गड उतरल्यानंतर करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रणोती करपे यांनी इतर किरकोळ जखमी पर्यटकांवर उपचार केले यावेळी रुग्णवाहिका चालक तुषार येनपुरे, वैभव भगवान यांच्यासह इतर किल्ल्यावर पर्यटकांनी व स्थानिकांनी सहकार्य केले.

किल्ल्यावर एखादी दुर्घटना झाल्यानंतर किंवा पर्यटक जखमी झाला तर त्याला स्ट्रेचरने गडावरून खाली आणण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही परंतु गडावर एका सामाजिक संस्थेकडून दिले गेलेले स्ट्रेचर तुटल्याने एकही स्ट्रेचर सुस्थितीत नसल्याने या ठिकाणी पुरातत्व विभागाने प्राथमिक सेवा पुरवणे आवश्यक असून स्ट्रेचर्स तसेच रेस्क्यू टीम साठी आवश्यक असणारे साहित्य देणे गरजेचे आहे.

- संतोष दसवडकर ,अध्यक्ष पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना

किल्ल्यांवरती ट्रेकिंगला जाताय मधमाशांपासून सावधान या मथळ्याखाली दैनिक सकाळमध्ये एक आर्टिकल फेब्रुवारी 2020 साली प्रसिद्ध झाले होते सदरचे आर्टिकल पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना देणारे असून या आर्टिकलचे फलक करून किल्ले राजगड व तोरणा परिसरात लावले जातील.

- राजेंद्र कचरे, भोर उपविभागीय अधिकारी भोर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.