PMCच्या निर्णयाबाबत व्यापाऱ्यांत ‘थोडी खुशी-थोडा गम’

Pune PMC
Pune PMC
Updated on

पुणे : जीवनावश्‍यक वस्तूंसह सर्व प्रकारची दुकाने खुली करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाबाबत व्यापारी वर्गात ‘थोडी खुशी-थोडा गम’ असल्याचे दिसून आले. पुणे व्यापारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर मोठे मॉल वगळता छोट्या स्वरूपात मार्केटमधील (शॉपिंग सेंटर) दुकाने देखील उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. (Traders a little happy and little sad about PMC decision)

कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने महापालिकेने शहरातील दुकाने एक जूनपासून सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत खुली करण्यास परवानगी दिली आहे.

Pune PMC
सैन्यदलात SSC अंतर्गत ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू

आठवड्यातील पाच दिवस ही परवानगी देण्यात आली आहे. त्याचे पुणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी स्वागत केले आहे. मात्र पुणे शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने मॉल आणि शॉपिंग सेंटरमधील दुकाने खुली करण्यास बंदी घातली आहे. त्यावर जैन म्हणाले,‘‘ रविवार पेठ, शुक्रवार पेठ, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता अशा शहरातील अनेक ठिकाणी छोटे छोटे शॉपिंग सेंटर आहेत. त्यातील दुकाने खुली करण्यास महापालिकेने परवानगी दिली पाहिजे. मोठ्या मॉलवर एक वेळ बंदी मान्य आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करावा.’’

Pune PMC
पुण्यात पहिले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर हडपसरमध्ये सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()