पुणे : शहरातील दुकाने सलग २५ दिवस बंद ठेवण्याच्या महापालिकेच्या आदेशावरून व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. विविध व्यापारी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर, लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱयांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून महापालिका आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले. दुकाने सुरू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याला शहरातील बहुसंख्य व्यापारी आता विरोध करू लागले आहे. सलग २५ दिवस दुकाने बंद ठेवली तर कामगारांना सांभाळायचे कसे, कर्जांचे हप्ते भरायचे कसे, लाईट बिल, भाडे द्यायचे कसे आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान खासदार गिरीश बापट यांनीही निर्बंध शिथिल करून दुकाने काही वेळ सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी लक्ष्मी रस्ता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मुनोत, उपाध्यक्ष प्रकाश रांका, कार्याध्यक्ष सचिन फिरोदीया, सेक्रटरी नितेश चोपडा आदींच्या नेतृत्त्वाखाली व्यापाऱयांनी मंगळवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर धरणे आंदोलन केले. व्यापारी सर्व नियम पाळून कामगारांचे चार दिवसांत लसीकरण करून घेतील. पण, सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी संघटनेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे, आणि पालकमंत्री पवार यांच्याकडे केली आहे.
वालचंद संचेती (अध्यक्ष ः दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स (महाराष्ट्र)) ‘‘व्यवसाय, दुकाने बंद ठेवण्याची क्षमता आता व्यापाऱ्यांमध्ये राहिलेली नाही. मागील लॉकडाउनमुळे व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे योग्य विचार करून त्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसाय व दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यांनी केली. दुकाने बंद असूनही व्यापाऱ्यांना दुसरीकडे सर्व कर भरावेच लागतात. व्यापाऱ्यांना नियम घालून द्यावेत; त्याचे पालन ते काटेकोरपणे करतील. परंतु, दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा.’’
नितीन पंडित (अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन) : कोरोनाच्या परिस्थितीत राज्य सरकार व पुणे महापालिकेने अत्यावश्यक दुकाने वगळता बाकी दुकाने बंद ठेवायचा घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा असून त्याला छोट्या व्यापाऱयांचा विरोध आहे. लसीकरणासाठी व्यापाऱयांना वयाची अट न देता प्राधान्य द्यावे. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर येत असताना अचानक दुकाने बंद करणे धक्कादायक आहे.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.