Pune Draught: पुणे जिल्ह्यात पारंपारिक दुष्काळ! शरद पवारांचं मुख्यंमत्र्यांना पत्र; म्हणाले, कायमचा...

पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कायमच दुष्काळी परिस्थिती असते.
Sharad Pawar_Eknath Shinde
Sharad Pawar_Eknath Shinde
Updated on

पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कायमच दुष्काळी परिस्थिती असते. यापार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्याचं आवाहन केलं आहे. पवारांनी पत्रात नेमक्या कुठल्या दुष्काळी भागाचा उल्लेख केला आहे जाणून घेऊयात. (Traditional drought in Pune district Sharad Pawar letter to CM Eknath Shinde)

लोकसभा निवडणुकीची सांगता झाल्यानंतर शरद पवार यांनी नुकताच १२ आणि १३ जून रोजी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध तालुके आणि त्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तिथल्या नागरिकांशी संवाद साधला त्यातून त्यांनी महत्वाची टिपणं तयार केली असून त्याद्वारे मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहतीचं पत्र लिहिलं आहे.

Sharad Pawar_Eknath Shinde
रविवारी तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची झुंबड; 'मुंज्या' आणि 'चंदू चॅम्पियन' कोण ठरलं वरचढ? वाचा दोन्ही चित्रपटांची कमाई

पवार आपल्या पत्रात म्हणतात, पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील कमी पाऊस असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनानं पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंतवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना सुरु केल्या आहेत. पण या योजनांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

Sharad Pawar_Eknath Shinde
Kanchanjunga Express Accident: कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे उडाले, मालगाडीची मागून धडक! भीषण अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

दरम्यान, यावेळी इथल्या ग्रामस्थांशी चर्चेदरम्यान इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी नागरिकांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. या समस्यांबाबत प्रकल्प निहाय आणि गावनिहाय स्वतंत्र टिपण पत्रासोबत जोडल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील हा पारंपारिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

यासाठी मुख्यंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मृदा व जलसंधारण मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत गांभीर्यपूर्वक बैठकीचं आयोजन करण्यात यावं. तसंच या बैठकीला संबंधित विभागाचे सचिव आणि लोकप्रतिनिधी यांना देखील बोलवण्यात यावं, असंही शरद पवारांनी मुख्यंमत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.