Pune Traffic Updates : सिमला चौकात आजपासून वाहतूक बदल

शहरातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे.
Pune Traffic Updates
Pune Traffic Updatessakal
Updated on

पुणे : शहरातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीत शुक्रवारपासून (ता. १७) बदल करणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

...असा आहे बदल

  • वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वीर चापेकर उड्डाण पुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहील.

  • पर्यायी मार्ग : वीर चापेकर उड्डाण पुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चापेकर चौक डावीकडे वळून न. ता. वाडी-उजवीकडे वळण घेऊन सिमला ऑफिस चौकाकडे जाता येईल.

  • फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चापेकर चौकातून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

  • पर्यायी मार्ग : चापेकर चौक - सरळ न. ता. वाडी चौक उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक.

  • न. ता. वाडी चौक ते वीर चापेकर चौक प्रवेश बंद राहील.

  • पर्यायी मार्ग : न.ता.वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौक.

  • स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.

  • पर्यायी मार्ग : सिमला ऑफिस चौक-डावीकडे वळून चापेकर चौक- उजवीकडे वळून न. ता. वाडी चौक- उजवीकडे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन.

  • शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून एसटी स्टँड सर्कलवरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

  • सिमला चौकाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी ‘एलआयसी’कडील बाजूने वीर चापेकर उड्डाण पुलावरून जावे.

  • वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व वाहनांना नो पार्किंग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.