Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त येरवडा भागात वाहतुकीत बदल

महाशिवरात्रीनिमित्त येरवडा भागातील तारकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे पर्णकुटी चौक परिसरात शुक्रवारी (ता. ८) तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
Traffic changes in Yerwada area due to Mahashivratri festival culture
Traffic changes in Yerwada area due to Mahashivratri festival cultureSakal
Updated on

Pune News : महाशिवरात्रीनिमित्त येरवडा भागातील तारकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे पर्णकुटी चौक परिसरात शुक्रवारी (ता. ८) तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

कोरेगाव पार्क बंडगार्डनकडून येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग : पुण्याहून नगर रस्त्याने विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांनी तारकेश्वर चौकातून डावीकडून वळून सादलबाबा चौकातून उजवीकडे जावे. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून उजवीकडे वळून नगर रस्ता आणि विमानतळाकडे जाता येईल.

संगमवाडीकडून कोरेगाव पार्क आणि नगर रस्त्याने जाणारी वाहतूक बंद राहील. पर्यायी मार्ग : संगमवाडीहून नगर रस्ता आणि कोरेगाव पार्ककडे जाणाऱ्या वाहनांना सादलबाबा चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सरळ नगर रस्त्याने आणि उजवीकडे वळून गुंजन चौकातून पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जाता येईल.

चंद्रमा चौकातून नगर रस्ता आणि कोरेगाव पार्ककडे येणारी वाहतूक बंद राहील. पर्यायी मार्ग : खडकीहून चंद्रमा चौकातून नगर रस्ता किंवा कोरेगाव पार्ककडे जाणाऱ्या वाहनांना चंद्रमा चौकातून डावीकडे वळून आळंदी जंक्शन, सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून गोल्फ क्लब चौकात जाता येईल. तेथून सरळ नगर रस्ता आणि कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहने गुंजन चौकातून उजवीकडे वळून पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्कच्या दिशेने जाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.