गणेशखिंड रस्त्यावर आठवडाभरात वाहतूक सुधारणा होणार : आयुक्त

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू झाल्याने गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात वाढत आहे.
Traffic
TrafficSakal
Updated on

पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे (Shivajinagar-Hinjewadi Metro Road) काम सुरू झाल्याने गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Traffic) मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यासाठी वाहतूक सुधारणा करण्यासाठी व रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिका, मेट्रो, पीएमआरडीएच्या (PMRDA) अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. येत्या आठवड्यात या भागात सुधारणा सुरू होणार आहेत.

पीएमआरडीएतर्फे शिवाजीनगर ते हिंजवडी ही २३ किलोमीटरची मेट्रो केली जाणार आहे. या मेट्रोचे काम करतानाच गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर यासह इतर कामे देखील पीएमआरडीएकडून केली जाणार आहेत. गेल्यावर्षी या चौकातील चुकलेला उड्डाणपूल पाडण्यात आला. पण वर्षभर पुन्हा नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्याने नागरिकांनी टीकेची झोड उठवली होती. अखेर दोन आठवड्यापूर्वी मेट्रोचे काम सुरू झाले आहे. पण या गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे.

Traffic
सातारा : शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

आज दुपारी महापालिका आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रस्ता मोठा करण्यासाठी पादचारी मार्ग काढणे, जागा ताब्यात घेणे, रस्ते रिसरफेसिंग करणे अशी कामे काही ठिकाणी सुरू केली आहेत, त्याची पाहणी केली, तसेच इतर ठिकाणची कामे या आठवड्यात पूर्ण केली जाणार आहेत. वाहतुकीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी साईन बोर्ड लावण्याचे काम पीएमआरडीएकडून केले जाणार आहे. पाणी पुरवठा विभागाने रस्त्यातील वॉल्‍व्हची जागा बदलणे, विद्युत विभागाकडून विजेचे खांब दुसरीकडे हलविणे अशी कामे येत्या आठवड्याभरात केली जाणार आहेत. तसेच पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, औंध रस्ता यांचीही कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

समन्वयाची जबाबदारी खेमणार यांच्यावर

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे कामे सुमारे तीन वर्ष चालणार आहे, त्यामुळे या भागात वारंवार वाहतूक सुधारणांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच प्रशासकीय कामात गती येणे आवश्‍यक असल्याने सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्यावर जबाबदारी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

Traffic
वढु बुद्रुक : छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्यदिव्य स्मारकाला मंजुरी

‘‘मेट्रोचे काम सुरू झाल्याने या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यांसंदर्भात आज महापालिका आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रस्ता मोठा करणे, जागा ताब्यात घेणे, साईन बोर्ड लावणे तसेच पाणी पुरवठा, विद्युत विभाग यांना त्यांची कामे त्वरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेट्रोकडून त्यांच्या मार्गाचे व स्टेशनचे लाईनमेंट महापालिकेकडे पाठविणार असून, त्यास त्वरित मान्यता दिली जाणार आहे. तसेच ज्या भागातून वाहतूक वळवली जाणार आहेत, तेथील कामे ही सुरू होणार आहेत.’’

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()