मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भोरवाडी- अवसरी-पेठ घाट (ता.आंबेगाव) ते खेड घाट (ता.खेड) या सहा किलोमीटर अंतरात शनिवारी संध्याकाळी चार वाजता वाहतूक कोंडी सुरू झाली. रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने पूर्व बाजूच्या दोन्ही लेन बंद आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गेली महिनाभर वारंवार होत आहे. सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल तीन ते साडेतीन तास कालावधी लागला.त्यामुळे प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी संध्याकाळी चार वाजता पुन्हा वाहतूक कोंडी सुरु झाली आहे.