पुणेकरांनो, ख्रिसमसनिमित्त लष्कर परिसरात वाहतुकीत बदल; वाचा सविस्तर

Traffic_Christmas
Traffic_Christmas
Updated on

Christmas Festival : पुणे : ख्रिसमस सणासाठी लष्कर परिसरातील चर्चमध्ये भाविक प्रार्थनेसाठी येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, शुक्रवारी (ता.25) यासाठी लष्कर परिसरामध्ये आवश्‍यकतेनुसार, वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 

ख्रिसमसमुळे शुक्रवारी ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी लष्कर परिसरातील चर्चमध्ये येतील. त्यामुळे लष्कर परिसरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात असलेल्या चर्चच्या परिसरात वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. आवश्‍यकतेनुसार, काही रस्ते तात्पुरते बंद ठेवून वाहतुक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 

असा आहे वाहतुकीमध्ये बदल आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था 

- वाय जंक्‍शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे (एमजी) येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात येईल. त्यामुळे वाहतूक कुरेशी मस्जिद आणि सुजाता मस्तानीजवळील चौकाकडे वळविण्यात येईल. 

- ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवर हॉटेलकडे जाणारी वाहतुकही बंद करण्यात येणार आहे. 

- व्होल्गा चौकाकडून महम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येईल. तेथील वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे. 

- इंदिरा गांधी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुकही बंद करण्यात येणार आहे. सदर वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलिस ठाणे चौकाच्या दिशेने वळविण्यात आली आहे. 

- सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक देखील बंद ठेवण्यात येईल. या मार्गावरून जाणारी वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.