वाहतूक पोलिसांमुळे रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाली

सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौकात महत्त्वाची एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे हरविली होती.
Rahibai nemane and Rn Jha
Rahibai nemane and Rn JhaSakal
Updated on
Summary

सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौकात महत्त्वाची एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे हरविली होती.

उंड्री - सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौकात महत्त्वाची एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे (Document) हरविली होती. मात्र, वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) प्रमाणिकपणामुळे मला परत मिळाली, अशी भावना सेवानिवृत्त मिलिटरी अधिकारी आर. एन. झा यांनी सांगितले.

सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौकात महिला वाहतूक पोलीस कर्मचारी राहिबाई नेमाने यांना एक पर्स सापडली. त्यामध्ये सहा हजार २०० रुपये रोख, लायसन्स, टीएम कार्ड, मिलिटरी कॅन्टीनचे कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रांची पर्स होती. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांना माहिती दिली.

Rahibai nemane and Rn Jha
पुणेकरांच्या अडचणी वाढणार; PMPML बसेस 25 मार्चपासून होणार बंद?

झेंडे यांनी मिलिटरीतील निवृत्त अधिकारी आर. एन. झा यांना बोलावून खात्री करून त्यांना परत दिले. याप्रसंगी पोलीस हवालदार सुनील बोरकर, महिला पोलीस शिपाई सावित्री पवार, राजकुमार बनसुरे, शरद रसाळ, माधुरी टिळेकर आदी उपस्थित होते.

आर. एन. झा म्हणाले की, वाहतूक पोलीस फक्त कारवाई करीत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर एखाद्याची वस्तू हरवली, तर ती परत देण्याचे काम प्रामाणिकपणे करतात. ही बाब समाधानाची आहे, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()