Latest Pune news: पुणे - सातारा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम रखडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पुण्या मुंबईकडून गावाकडे मतदान करण्यासाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
आपले मतदान होते की नाही या काळजीत मतदार पडले आहेत तर प्रशासनाला याबाबत काही घेणं देणं नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस यंत्रणा मतदान कार्यात गुंतल्याने कोंडी सोडवण्यासाठी कोठेही रस्त्यावर पोलीस दिसून आला नाही. मात्र महामार्ग वाहतूक पोलीसांनी वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे होते.