प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची 'ती' ऑडी मोटार पोलिसांच्या ताब्यात; लाल दिव्याच्या या गाडीवर काय लिहिलं होतं?

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी (IAS Officer) पूजा खेडकर सरकारी कार्यालयात येण्यासाठी ही खासगी मोटार वापरत होत्या.
Trainee IAS officer Pooja Khedkar Audi car
Trainee IAS officer Pooja Khedkar Audi caresakal
Updated on
Summary

शहर वाहतूक पोलिसांनी खेडकर यांना ती मोटार पोलिस (Pune Police) ठाण्यात हजर करण्याबाबत नोटीस बजावली होती.

पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्याकडून वापरण्यात येत असलेली ती खासगी ऑडी मोटार (Audi Car) पुणे पोलिसांनी रविवारी (ता. १४) ताब्यात घेतली आहे. खेडकर यांनी या मोटारीवर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिले होते. तसेच, या मोटारीवर बेकायदेशीररीत्या लाल दिवा लावल्याचे समोर आले होते.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी (IAS Officer) पूजा खेडकर सरकारी कार्यालयात येण्यासाठी ही खासगी मोटार वापरत होत्या. तसेच, त्या मोटारीवर लाल दिवा लावल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या संदर्भात शहर वाहतूक पोलिसांनी खेडकर यांना ती मोटार पोलिस (Pune Police) ठाण्यात हजर करण्याबाबत नोटीस बजावली होती.

Trainee IAS officer Pooja Khedkar Audi car
शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत मनोरमा खेडकरांना नोटीस; दहा दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास होणार कारवाई

दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिस ही नोटीस देण्यासाठी बाणेर येथील बंगल्यात पोचले होते. परंतु, त्यांना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी बंगल्यात प्रवेश न देता त्यांच्याशी वाद घातला होता. शासकीय नियमानुसार, खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिता येत नाही. परंतु खेडकर यांनी खासगी मोटारीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावली होती.

चौकशीदरम्यान, या मोटारीवर मागील दोन वर्षांत २१ वेळेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. पूजा खेडकर यांच्याकडून वापरण्यात येत असलेली ती मोटार त्यांच्या चालकाने रविवारी पहाटे साडेतीन वाजता चतु:शृंगी पोलिस ठाण्यात आणून जमा केली, अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक शफील पठाण यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.