- शैलेंद्र बोरकर, पुणेग्राम आरोग्य रक्षक प्रकल्पामुळे वनवासी पाड्यांची वाटचाल निरामय ग्रामकडे झाली आहे. प्रकल्पाची सुरुवात ८० पाड्यांपासून झाली. ग्राम आरोग्य रक्षक प्रकल्प आज तब्बल १२४ पाड्यांवर राबविण्यात येत आहे..महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमवेर डांग जिल्हा आहे. काही वर्षांपूर्वी डांग जिल्ह्यातील शबरीधाम येथे शबरीकुंभ हा कार्यक्रम झाला. शबरीकुंभाच्या तयारीसाठी महाराष्ट्रातूनही संघाचे कार्यकर्ते जात होते. या तयारीसाठी जात असताना शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील साल्हेर मुल्हेर परिसरात या कार्यकर्त्याचा सतत संपर्क झाला..त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आले की, डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या येथील वनवासी बांधवांना आरोग्याच्या अगदी प्राथमिक सुविधा देखील मिळत नाहीत. आपण या वनवासी बांधवाना काही ना काही सेवा देणे जरुरीचे आहे, असा विचार त्यांनी केला आणि शबरीकुंभ कार्यक्रम झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जनकल्याण समितीच्या माध्यमातून कामाची आखणी केली. त्यातून ग्राम आरोग्य रक्षक प्रकल्प या नावाने हे सेवाकार्य सुरू झाले. गावागावात आरोग्य रक्षक नेमण्यात आले आणि वनवासी बांधवांसाठीच्या या सेवाकार्याचा प्रारंभ झाला..हे सेवाकार्य सुरू करताना आधी कार्यकर्त्यांनी कोणत्या पाड्यावर आरोग्य रक्षक नियुक्त करण्याची आवश्यकता आहे याचे सर्वेक्षण केले, त्यातून ८० पाड्यांची निश्चिती करण्यात आली. आरोग्य रक्षक म्हणून ज्याने काम करायचे तो त्याच गावातील शिकलेला तरुण असावा, असेही निश्चित करण्यात आले होते. म्हणून त्यांचा शोध सुरू झाला. गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांचीही त्यासाठी मदत घेण्यात आली..या निवडलेल्या ८० वनवासी पाड्यातील बहुतांश पाडे हे अत्यंत दुर्गम भागातील आहेत. काही ठिकाणी तर मोटार सायकल सुद्धा जाणार नाही अशी वस्ती. म्हणून ८० पाड्यांचे चार भाग करून सुरुवातीला २० पाडयांसाठी आरोग्य रक्षक निश्चित करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.त्यानंतर आणखी २० पाडे. असे संपूर्ण चार आठवडे प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांना प्रशस्तिपत्र देऊन, त्यांना प्रमाणित करण्यात आले. त्यानंतर पाड्यांवर आरोग्य रक्षक प्रकल्प प्रत्यक्ष सुरू झाला. पाड्यावर, वस्तीवर आरोग्य रक्षक प्रकल्प सुरू झाला आहे, हे सर्वांना समजावे यासाठी दवंडी पिटून जागल्या मार्फत सर्वाना कल्पना दिली गेली..आरोग्य रक्षक त्याच गावातील सर्वांच्या परिचयाचा असल्याने गावकरी मोठया विश्वासाने त्याच्याकडे जायला लागले. आरोग्य रक्षकाने सुद्धा अतिशय प्रेमाने गावकऱ्यांना औषध देण्यास सुरवात केली. ताप, जुलाब, पोटदुखी, आम्लपित्त, अंगदुखी अशा काही आजारांमध्ये घरगुती म्हणता येतील अशी औषधे देऊन प्राथमिक उपचार करण्याचे काम हे आरोग्य रक्षक करतात.हा पूर्ण उपचार नसून आजारावरील प्राथमिक उपचार असतो. आरोग्य रक्षकांना औषधाची पेटी तसेच अन्य आवश्यक साहित्य जनकल्याण समितीतर्फे दिले जाते. आरोग्य रक्षक प्रकल्पाचा चांगला लाभ ग्रामस्थांना होऊ लागला आणि प्रकल्पाची चर्चा शेजारच्या पाड्यांवर होऊ लागली..पुढे मग आमच्याही पाड्यावर आरोग्य रक्षक नेमा असा आग्रह आणखी २० पाड्यांनी धरला. यथावकाश आणखी २० पाड्यावर आरोग्य रक्षक नेमून त्यांना प्रशिक्षण दिले गेले. सुरवातीला ८० पाड्यांपासून सुरू झालेला ग्राम आरोग्य रक्षक प्रकल्प आज तब्बल १२४ पाड्यांवर सुरू असल्याची माहिती प्रकल्पाचे संयोजक अरविंद जोशी यांनी दिली..परिसरातील स्वच्छताया प्रकल्पाचे मार्गदर्शक आबा बच्च्छाव सांगतात की, मन्साराम गावित, वसंत सूर्यवंशी, भटू साबळे हे अगदी सुरवातीपासून आरोग्य रक्षक म्हणून काम करत आहेत. अच्युतराव देशपांडे, शरद गांगुर्डे यांनी अनेक वर्षे प्रमुख म्हणून या प्रकल्पात काम केले. आरोग्य रक्षक प्रकल्प व्यवस्थित सुरू झाल्यानंतर गावातील अन्य समस्यांकडेही लक्ष द्यायला सुरवात करण्यात आली.बन्सीलाल कांकरिया, गोविंदराव यार्दी, अनिकेत सोनवणे यांनी हा प्रकल्प उत्तमरीत्या चालावा यासाठी सातत्याने प्रवास करून प्रकल्प स्थिर करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. दुसर्या टप्प्यात पाड्यांवरील प्रत्येक घरासमोर सांडपाण्यासाठी शोषखड्डा करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे परिसरात स्वच्छता रहायला लागली. प्रत्येक घरात तुरटीचे वाटप केले गेले..या सर्व प्रयत्नांनी केवळ व्यक्तीचे नाही तर संपूर्ण गावाचेच आरोग्य सुधारण्यास मदत झाली. तरीही काही जणांचे व्यसनाचे प्रमाण काही कमी होत नव्हते. गावातील मंदिरासाठी भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. आरोग्य रक्षकांनी जाणीवपूर्वक व्यसनी लोकांना भजनाला बोलावून हळूहळू त्यांना व्यसनापासून दूर केले आणि त्यातून व्यसनमुक्तीही झाली. ग्राम आरोग्य रक्षक प्रकल्पामुळे वनवासी पाड्यांची वाटचाल निरामय ग्रामकडे झाली आहे.(लेखक ‘सेवा भारती’ या अखिल भारतीय संस्थेचे पदाधिकारी आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.