Pune News : घोरपडीत पंधरा ठिकाणी झाडे कोसळली

घोरपडी परिसरात सोमवारी विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच पावसासोबत जोराचा वारा सुटल्याने जवळपास पंधरा ठिकाणी झाडे पडली.
Pune news
Pune newssakal
Updated on

घोरपडी : घोरपडी परिसरात सोमवारी विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच पावसासोबत जोराचा वारा सुटल्याने जवळपास पंधरा ठिकाणी झाडे पडली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकून पडली. जवळपास हजार वाहने या रस्त्यावर अडकून होती.

एम्प्रेस गार्डन येथे सायंकाळी सावरीचे झाड रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकीवर पडून वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाला. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी चारचाकीचे छत कापून त्या व्यक्तीला सुरक्षितरीत्या बाहेर काढले.

झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला होता. फातिमानगर ते राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत दोन्ही बाजूला मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक सोपान बाग परिसरातून हडपसरकडे वळविण्यात आली होती.

यामुळे सोपान बाग ते बी. टी. कवडे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच फातिमानगर ते पुलगेटपर्यंत वाहनांच्या रात्री अकरापर्यंत झाड तोडण्याचे काम सुरू होते. एम्प्रेस गार्डनसमोरील रस्ता पूर्ण ठप्प होता. तसेच रेसकोर्स परिसरातील सर्व रस्ते आणि वानवडी भागातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.

सोपान बाग परिसरात उड्डाण पुलाजवळ दोन झाडे पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सोबतच शिर्के कंपनीच्या प्रवेशद्वारजवळ गुलमोहराचे मोठे झाड कोसळून वाहतूक कोंडी झाली होती. ढवळे वस्ती, आर्मी परिसरात अशा अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.