दौंड: कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या देशातील पोलिस अधिकारी व जवानांना दौंड शहरात पोलिसांच्या वतीने मानवंदना देत अभिवादन करण्यात आले. राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच येथे मानवंदना देण्यात आली..पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या कवायत मैदानावर अभिवादन करण्यात आले. देशभरात १ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या नामावलीचे या वेळी वाचन करण्यात आले. राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातच्या समादेशक राजलक्ष्मी शिवणकर, गट पाचचे समादेशक सोमनाथ वाघचौरे व पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या बारामती विभागाचे अपर अधीक्षक गणेश बिरादार यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून या वेळी मानवंदना दिली.धीरगंभीर वातावरणात पोलिस बॅण्ड पथकाने शोक धून वाजविली. सहायक समादेशक सचिन डहाळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकांनी रायफलीच्या हवेत तीन फैरी झाडल्या. नक्षलग्रस्त व अन्य भागांमध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या दौंड येथील गटांमधील पोलिसांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते..Hutatma Smriti Day : या घटनेची स्मृती म्हणून महाराष्ट्र २१ नोव्हेंबरला हुतात्मा स्मृती दिन साजरा करतो .पोलिस हुतात्मा दिनलडाखच्या पूर्वोत्तर भागातील हॉटस्प्रिंग येथे २१ ऑक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलिस सुरक्षा दलाच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या बटालियनने केलेल्या हल्ल्यात भारताचे दहा जवान हुतात्मा झाले होते. राष्टासाठी सर्वोच्च बलिदान देणार्या या पोलिसांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण व्हावे याकरिता हा दिवस देशभरात पोलिस हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो. हुतात्मा झालेल्या पोलिसांप्रमाणे राष्ट्रनिष्ठेची ज्योत पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सदैव तेवत राहावी, याकरिता जानेवारी १९६० मध्ये झालेल्या देशाच्या सर्व पोलिस महानिरीक्षकांच्या परिषदेत दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पोलिस हुतात्मा दिनी अभिवादन केले जाते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.