Accident : अंत्यविधी उरकून आलेल्या लोकांमध्ये भरधाव ट्रक घुसुन झालेल्या अपघातात चार जणांचा मुत्यू, सहा जण गंभीर जखमी

नगर-कल्याण महामार्गावर भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून आलेल्या लोकांमध्ये घुसुन झालेल्या अपघातात चार जणांचा मुत्यू, तर सहा जण गंभीर जखमी.
Death in Accident
Death in Accidentsakal
Updated on

आळेफाटा - नगर-कल्याण महामार्गावर भरधाव ट्रकने अंत्यविधी उरकून आलेल्या लोकांमध्ये घुसुन झालेल्या अपघातात चार जणांचा मुत्यू. तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी जवळपास साडेचार तास महामार्ग रोखला होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या गुळंचवाडी (ता.जुन्नर) या गावात शुक्रवारी सकाळी अंत्यविधी होता. व या गावची स्मशानभुमी या मार्गाच्या बाजुला असुन अंत्यविधी उरकल्यानंतर नागरीक रस्त्यावरून बाहेर जात असताना त्याचवेळी नगरकडुन आलेला भरघाव वेगाने आलेल्या एम.एच.१०ए.डब्लू ३२९७ या ट्रकने महामार्गाच्या कडेला लावलेल्या पाच ते सहा वाहणांना घडवुन अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक जण दवाखान्यात उपचार चालु असताना मुत्यूमुखी पडले, व सहा जण गंभीर जखमी झाल्यानंतर गुळूंजवाडी नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेला.

घटनास्थळावर स्थानिक नागरिक आक्रमक होत रास्ता रोको केला. ग्रामस्थांनी बायपास करण्याची वारंवार मागणी करूनही गुळूंजवाडी गावावातून महामार्ग गेल्याने अपघात होत असून महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर बसले आहे.

चार तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी आमदार अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, माऊली खंडागळे, मोहीत ढमाले, सुरज वाजगे,वल्लभ शेळके, अतुल भांबेरे आदी मान्यवरांनी भेटी देत आंदोलनात सहभागी झाले.तसेच अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. तसेच नगर - कल्याण नॅशनल हायवे चे प्रकल्प अधिकारी गोरड यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे निवेदन स्विकारले.

प्रतिक्रिया - डॉ. अमोल कोल्हे खासदार

गुळूंजवाडी या ठिकाणी झालेला अपघाताची अतीशय दुःखद घटना असुन मयत झालेल्या व्यक्तींसाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे मागणी करणार असुन गुळूंजवाडी गावात बायपास करण्यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे सागितले व महामार्गावर तत्काळ गतिरोधक टाकण्याच्या सूचना साबंधीताना दिल्या आहे.

प्रतिक्रिया -अतुल बेनके आमदार जुन्नर

आणे घाटात उताराने गाड्या येत असल्याने गुळूंजवाडी गावात भीषण अपघात झाल्याने आम्हाला आज काळा दिवस पाहावा लागला. महामार्ग मोठा झाला मात्र महामार्ग अधिका-यांनी गावातून जाणाऱ्या रस्त्यासाठी योग्य नियोजन केले नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. गुळूंजवाडी या ठिकाणी वारंवार अपघात होत असुन येथील ग्रामस्थांनी बायपास करण्याची मागणी केली आहे त्यासाठी प्रयत्न करणार असुन अपघातात मृत झालेल्या व्यक्तीसाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी शासण दरबारी मांडणार असल्याचे सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.