Toor Dal Price: तूरडाळ यंदा पावणेदोनशे पार; सर्वसामान्य त्रस्त; सर्व प्रकारच्या डाळींच्या भावात वाढ

सर्व प्रकारच्या डाळींच्या भावात वाढ
Toor Dal Price
Toor Dal PriceSakal
Updated on

पुणे - धान्य बाजारात डाळींच्या भावात मागील दोन महिन्यांत किलोमागे १० ते २५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तूर डाळ १६५ ते १७७ रुपये, तर उडीद डाळ १२० ते १३८ रुपये किलोपर्यंत गेली आहे. मूग डाळीनेही शंभरी ओलांडली आहे. यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. सलग दोन वर्षे कडधान्याचे उत्पादन चांगले झाले होते. त्यामुळे डाळींचे भाव नियंत्रणात होते. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते, त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला. बाजारातील आवक घटली असून घाऊक आणि किरकोळ बाजारात डाळींचे भाव वाढले आहेत.

भुसार बाजारात डाळी आणि कडधान्याची दररोज सुमारे १५० ते १७५ टन आवक होते. सध्या लग्नसराईसह विविध समारंभ सुरू आहेत. हॉटेलात खाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या डाळींना मागणी असून भावात वाढ झाल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले. डाळींच्या तेजीचा परिणाम म्हणून बेसन आणि भाजके डाळे भावात आणखी वाढ झालेली पाहावयास मिळत आहे. बाजारात गेल्या काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने डाळींचे भाव वाढत आहेत.

सद्यःस्थिती काय?

  • आयात शुल्क जास्त असल्याने मालाची कमतरता

  • बाजारात तूर डाळ आणि चना डाळीचा तुटवडा

  • मागील वर्षी देशभरात पाऊस कमी

  • पेरण्या कमी झाल्याने उत्पादनात घट

‘अकोला, वाशीम, लातूर, उदगीर, बार्शीसह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकातून तूर डाळ मार्केट यार्डात येते. लातूर, अकोल्याहून हरभरा डाळ येते. बाजारात तूर डाळीला जास्त मागणी असल्याने भावात वाढ झाली आहे.’

- जितेंद्र नहार, धान्याचे व्यापारी, मार्केट यार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com