Online Textbook : बाराशे दुर्मिळ ग्रंथ ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध

पुणे नगर वाचन मंदिराचा डिजिटायझेशन प्रकल्प.
Online Textbooks
Online Textbookssakal
Updated on

पुणे - बदलत्या काळाची गरज ओळखत पुणे नगर वाचन मंदिराने सुरू केलेल्या दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनच्या प्रकल्पात सुमारे १२०० दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व ग्रंथ ऑनलाइन स्वरूपात वाचकांसाठी विनामूल्य स्वरूपात उपलब्ध आहेत. पुणे नगर वाचन मंदिर ही वाचन संस्कृतीसाठी कार्यरत असणारी १७६ वर्षे जुनी संस्था आहे. २०१९ मध्ये संस्थेने हा डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला.

‘२०१९ मध्ये सांगली-कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात तेथील स्थानिक ग्रंथालयांमधील दुर्मिळ ग्रंथांचे नुकसान झाले. त्यातून आपल्याकडील दुर्मिळ ग्रंथांमधील ज्ञान जतन करण्याची निकड संस्थेच्या कार्यकारिणीच्या लक्षात आली. तसेच इंटरनेटच्या युगात वाचक, विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक यांच्या ज्ञानसंपादनाच्या गरजाही बदलल्याचे दिवसेंदिवस जाणवत होते. म्हणून अरविंद रानडे यांच्या पुढाकारातून डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला. संस्थेच्या संपूर्ण कार्यकारिणीने हा प्रकल्प राबवला,’’ असे सहकार्यवाह प्रसाद जोशी यांनी सांगितले.

प्रकल्पासाठी संस्थेने ‘विकिमिडिया कॉमन्स’ यांच्याशी करार केला असून, या जागतिक संकेतस्थळावर तसेच संस्थेच्या संकेतस्थळावर डिजिटाईज करण्यात आलेले ग्रंथ शोधनीय स्वरूपात उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, मुक्त ज्ञानप्रसार हे उद्दिष्ट असल्याने सर्व ग्रंथ विनामूल्य उपलब्ध आहेत.

यात केवळ पुणे नगर वाचन मंदिरच नव्हे, तर वाई, भोर येथील सार्वजनिक वाचनालये, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा या संस्थांकडील दुर्मिळ ग्रंथाचेही डिजिटायझेशन केले आहे. हे सर्व ग्रंथ कॉपीराइट मुक्त असून, यात १ जानेवारी १९२६ पूर्वी प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा समावेश आहे. विविध विषयांतील १२०० ग्रंथांचा समावेश आहे.

प्रकल्पाच्या विस्तारासाठी प्रयत्न...

प्रकल्पाचा विस्तार व्हावा आणि अधिकाधिक संस्थांनी आपल्याकडील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करावे, यासाठी पुणे नगर वाचन मंदिराने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत नुकतीच संस्थेतर्फे कार्यशाळा आयोजित केली होती. येथे राज्यभरातून आलेल्या ग्रंथपालांना डिजिटायझेशन प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.