शिवाजीनगर : विश्रांतवाडी (vishrantwadi) येथे राहत असलेले चंद्रशेखर अडागळे व त्यांची पत्नी मृणाली यांचा मुलगा कु.शिवांश हा अवघा सव्वादोन वर्षाचा असताना त्याची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने (india book of record) घेतली आहे.शाळेत जाण्यापूर्वीच शिवांशला २३ मराठी व इंग्रजी कविता तोंडपाठ आहेत, एक ते तीस पर्यंतचे इंग्रजी आकडे, संपूर्ण इंग्रजी वर्णमाला शब्दा सहित म्हणून दाखवतो, बारा रंग, सदतीस प्राणी, चौदा फळे, बारा भाज्या, वीस अवयव, दहा आकार ओळखतो व बोलून दाखवतो.एक ते दहा इंग्रजी अंक संगणकाच्या की-बोर्ड वर बिनचूक टाईप करतो. पंधरा प्राण्यांचे आवाज काढतो. (Two year old Shivanshs entry Indias Book of Records)
हनोई टॉवर नऊ सेकंदात लावतो. २७ पेक्षा जास्त क्रिया करतो, आठवड्याचे दिवस म्हणून दाखवतो, वाहनांचे वेगवेगळे भाग ओळखतो. हे कौशल्य पाहून शिवांशची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, जगदीश मुळीक, प्रदीप देशमुख, विनोद पवार यांनी शिवांशचा सत्कार करून कौतुक केले.
शिवांशची आई सांगतात "जन्मापासूनच शिवांशची बौद्धिक व शारीरिक वाढ इतर मुलांपेक्षा जलद गतीने होत असलेले जाणवले. (जसे की पालथा पडण्याचा प्रयत्न त्यांनी सव्वा महिन्याच्या आधीच सुरू केला. बसणे, चालणे, बोलणे, उभं राहणे) या क्रिया तो लवकर शिकला. आम्ही घरामध्ये जसे वागतो, बोलतो, क्रिया करतो ते सर्व बघून त्याचे निरीक्षण करून त्याप्रमाणे तो अनुकरण करत होता. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक क्रिया करताना (म्हणजेच जेवण करताना,पाणी पिताना, काही काम करताना) आम्ही सतत कविता किंवा इंग्रजी अल्फाबेट म्हणून दाखवत होते. यासह अनेक वेळा तो रडत असताना एखादी कविता ऐकवल्यास तो शांत होत असे.
तसेच त्याचा बराचसा काळ लॉकडाऊनमध्ये गेल्याने खिडकी व बाल्कनी मध्ये उभा राहून त्याला जास्तीत - जास्त गोष्टी (जसे की झाडे हिरवी असतात, कावळा काळा, दरवाजा आयात,चंद्र गोल असे) प्रत्यक्ष दाखवून देत होतो. हे ऐकून त्याच्या लक्षात राहत गेले. हे सर्व रेकॉर्ड करायचे या हेतूने करत नव्हतो. तो त्यामध्ये रमत असल्याने आम्ही त्याला सर्व सांगत गेलो. लहान मुलांची छोटी पुस्तके, फ्लॅश कार्ड, कापडी पुस्तके, प्राण्यांची खेळणी, अवयव, बाराखडी (इंग्रजी) भाज्या,दाखवत होतो. तो बोलायला लागल्यापासून असे लक्षात आले की एखादी कविता किंवा गोष्ट त्याच्या कानावर पडली की त्याला पाठ होऊ लागल्या. अशा प्रकारे तो बरंच काही शिकत गेला. मोबाईल मध्ये कविता, गोष्टी लावून तो मोबाईल त्यांच्याकडे न देता फक्त त्यांच्या कानावर आवाज येईल एवढ्या अंतरावर ठेवून त्याला ऐकवतो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याने आम्हा सर्वांना खूप आनंद झाला".
"शिवांशचा वडिल म्हणून मला त्याचे खूप कौतुक वाटते.त्याने लहान वयातच अभिमानास्पद कौशल्य आत्मसात केले आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला," असे चंद्रशेखर अडागळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.