पुणे शहरात वादळीवारा व पावसामुळे दोन दिवसात 55 झाडे कोसळली

पुणे शहरात दोन दिवसांपासून झालेल्या वादळीवारा व जोरदार पावसामुळे वेगवेगळ्या भागात सोमवारी सायंकाळपर्यंत 55 झाडे कोसळली.
Tree Collapse
Tree CollapseSakal
Updated on

पुणे - शहरात दोन दिवसांपासून झालेल्या वादळीवारा (Stormy) व जोरदार पावसामुळे (Rain) वेगवेगळ्या भागात सोमवारी सायंकाळपर्यंत 55 झाडे कोसळली. (trees Collapsed) अग्निशामक दलाकडून रस्त्यांवर पडलेली झाडे तत्काळ हटवून रस्ते मोकळे करण्यास प्राधान्य देण्यात आले. या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारे जीवीतहानी झाली नसल्याचे अग्निशामक दलाने स्पष्ट केले. (Two days 55 trees fell due to storms and rains in different parts of Pune city)

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते या चक्रीवादळाचा परिणाम पुणे शहरावरही झाला. शनिवारी रात्रीपासूनच शहरात जोरदार वारे वाहात होते. प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि त्यातच सातत्याने होणारा पाऊस, यामुळे शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या 40 घटना घडल्या होत्या. याबाबत अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नागरीकांच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली मोठमोठी झाडे यंत्राच्या सहाय्याने कापून रस्ते मोकळे केले.

Tree Collapse
विधायक! कोरोना काळात नागरिक शेतकरी संघाचे कार्य उल्लेखनिय

दरम्यान, शनिवारच्या तुलनेत रविवारी रात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत वादळ व पावसाचे प्रमाण कमी होते.तरीही शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या 15 घटना घडल्या. कात्रज येथील तिरंगा हॉटेल, लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौक, धनकवडीतील राजमुद्रा सोसायटी, सोमवार पेठेतील पवार वाडा, कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरातील सनश्री सोसायटी, कोरेगाव पार्क गल्ली क्रमांक , हडपसरमधील काळेपडळ, दत्तवाडी पोलीस चौकीजवळ, हडपसर औद्योगिक वसाहत, विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील दामले पथ, सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मेरीयट हॉटेलजवळ, घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रस्ता, गणेशखिंड रस्ता, नेहरू रस्त्यावरील कल्याण भेळ या परिसरात झाडे कोसळली. दरम्यान, या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.