Pune News : पाटस परिसरात बिबट्याचा धुमाकूळ,हल्ल्यात दोन शेळ्या व एका कुत्र्याचा मृत्यू

नागरीकांनी वनविभागाला पिंजरा लावुन बिबटया जेरबंद करण्याची मागणी केली
two goat and dog dies in leopard attack patas daund forest department
two goat and dog dies in leopard attack patas daund forest department Sakal
Updated on

पाटस : पाटस (ता.दौंड) येथे बिबटयाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे.येथील पंचशील नगर भागात बिबटयाच्या हल्यात दोन शेळ्या व एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.शिवारात बिबटयाचा वावर वाढल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दौंड तालुक्यात मागील काही दिवसापासुन वरवंड,गार,सोनवडी,गार फाटा,पाटस परीसरात बिबटयाचे अनेकांना दर्शन घडले आहे.त्यामुळे नागरीकांनी वनविभागाला पिंजरा लावुन बिबटया जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी (ता.१६) सायंकाळी गारफाटा येथे संजय कुदळे या शेतकऱयाला उसाच्या शेता लगत बिबटयाचे दर्शन घडले.प्रचंड मोठया आकाराचा बिबटयाच असल्याचे त्यांनी सांगितले.बाजुच्या शेतात मेंढळयांचे वाडगे असल्यानेत्या दिशेने बिबटया येत असल्याचे कुदळे यांनी सांगितले.

याबाबत त्यांनी वनविभागाशीसंपर्क साधला.वनरक्षक रामेश्वर तेलंगरे यांनी घटनास्थळी धाव घेवुन नागरीकांसह शेत शिवारात बिबटयांच्या ठशांची पाहणी केली.यावेळी त्यांनी नागरीकांना सर्तक राहण्याचेआवाहन केले.

तसेच बुधवारी मध्यरात्री पंचशील नगर भागात बिबटयाने धुमाकुळ घातला.अगदी लोकवस्तीच्या लगत गंगुबाइ दशरथ भागवत यांचे राहते घर आहे.घराच्या समोर बांधलेल्या शेळ्यांवर बिबटयाने हल्ला चढविला.

यामध्ये दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.तसेच एका कुत्र्यावर देखील बिबटयाने हल्ला केला. माहीती मिळताच वनअधिकारी व कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली. शेळ्यांवरील हल्ला बिबटयाचाच असल्याचे प्रथमदर्शी दिसुन येत असल्याचे वनकर्मचाऱयांनी सांगितले.

दरम्यान,शिवारात बिबटयाचा अस्तित्व आढळुन आल्याने नागरीकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. शेतात मजुर कामास येण्यास टाळा टाळ करीत आहे. शिवाय जिवमुठीत घेवुन शेतात जावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.