पुणे - पुणे महापालिकेने ४० टक्के सवलत देण्यासाठी साडे चार लाख घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केले. त्यापैकी २ लाख १६ हजार घरांमध्ये भाडेकरू आढळून आल्याने या सदनिकामालकाची ४० टक्के सवलत गेली असून, त्यांना १०० टक्के कर लावला जाणार आहे. तर २ लाख २९ हजार ३७९ मिळकतींमध्ये स्वतः मालक राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने या नागरिकांना ४० टक्क सवलत देण्यात येणार आहे.